स्विससाठी ब्रिलचा निर्णायक गोल…

कॅमरूनचा १-० ने पराभव : दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोहा : स्वित्झर्लंडने त्यांच्या फिफा विश्वचषकाच्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. २४ नोव्हेंबर रोजी कतारमधील अल जनाब स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी कॅमेरूनचा १-० असा पराभव केला. 
हेही वाचाःShraddha murder case: श्रद्धाच्या मारेकऱ्याला होईल कठोर शिक्षा…

ब्रिल एमबोलोने खेळाच्या ४८व्या मिनिटाला केला गोल

या सामन्यात दोन्ही संघांकडून जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. स्वित्झर्लंडसाठी ब्रिल एमबोलोने खेळाच्या ४८व्या मिनिटाला एकमेव गोल केला. जो निर्णायक ठरला. यानंतर कॅमेरून संघाला गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण स्वित्झर्लंडच्या सर्वोत्तम बचावासमोर त्याला एकही कामगिरी करता आली नाही.   
हेही वाचाःअकरा महिन्यांपूर्वीचा ड्रग्ज ‘निगेटिव्ह’; नायजेरियनाची निर्दोष सुटका..

स्वित्झर्लंडने गमावला नाही पहिला सामना      

सहा फिफा विश्वचषकानंतर स्वित्झर्लंडने सलामीचा सामना गमावलेला नाही. १९६६ च्या विश्वचषकात शेवटच्या वेळी त्यांचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला होता. तेव्हा स्वित्झर्लंडचा जर्मनीकडून पराभव झाला होता. दुसरीकडे, कॅमेरून सलग आठ विश्वचषकातील पहिला सामना गमावत आहे. १९३० ते १९५८ दरम्यान, फिफा विश्वचषकाच्या इतिहासात मेक्सिकोने ९ पेक्षा जास्त सामने गमावले होते. 
हेही वाचाःमडगाव पोलिसांची मिनी कॅसिनोवर धाड…

स्विसने घेतला फायदा

१०व्या मिनिटाला कॅमेरूनला आघाडी घेण्याची संधी होती, परंतु एमबुमोने स्ट्रायकर एरिक मॅक्सिम चुपो मोटिंगला पास देण्याऐवजी गोलवर शॉट घेतला आणि तो अपयशी ठरला. त्यानंतर रिबाऊंडवर मिळालेल्या संधीचा फायदा उठवण्यात कॅमेरॉन अपयशी ठरला. ही मोठी संधी गमावण्याचा फटका कॅमेरूनला सहन करावा लागला कारण त्यानंतर स्वित्झर्लंडने सामन्यावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आणि आक्रमणेही तीव्र केली. मात्र, त्यानंतरही पूर्वार्ध ०-० असाच राहिला. कॅमेरूनच्या पहिल्या हाफच्या अपयशाचा फायदा घेत स्वित्झर्लंडने दुसऱ्या हाफच्या पहिल्या ३ मिनिटांतच आघाडी घेतली. २५ वर्षीय ब्रिलसाठी हा गोल खूप खास होता कारण त्याने हा गोल ज्या देशात तो जन्मला त्या देशाविरुद्ध केला होता. ब्रिलच्या या गोलनंतर कॅमेरूनने जोरदार प्रयत्न केले, पण स्विस बचावफळी त्यांना भेदता आली नाही. त्याचवेळी स्वित्झर्लंडनेही आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न केला पण कॅमेरूनचा गोलरक्षक आंद्रे ओनाने त्याला उत्कृष्ट सेव्ह करून रोखले. मात्र, एमबोलोचा गोल स्वित्झर्लंडसाठी पुरेसा ठरला आणि त्याने विजयासह खाते उघडले.
हेही वाचाःनायजेरियन नागरिकांवर धारदार हत्याराने हल्ला, चौदा संशयित आरोपमुक्त…

स्वित्झर्लंडचे हाफ टाईमनंतर १२ गोल      

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात स्वित्झर्लंडने हाफ टाइमनंतर १५ पैकी १२ गोल केले आहेत. म्हणजेच हाफ टाईमनंतर संघाने ८० टक्के गोल केले आहेत. यादरम्यान गोल करण्यासाठी त्यांची सरासरी वेळ ६० मिनिटे होती. 
हेही वाचाःकथेसोबत कोकणची सैर घडविणारा ‘थ्री ऑफ अस’…

पोर्तुगालची घानावर मात

फिफा विश्वचषक २०२२ हंगामात स्टार फुटबॉलपटू ​​ख्रिस्तियानो रोनाल्डो आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरला आणि आपली जादू चालवली. रोनाल्डोचा संघ पोर्तुगालचा घानाशी सामना होता. हा सामना खूपच रोमांचक झाला, ज्यामध्ये पोर्तुगालने ३-२ ने विजय मिळवला. पोर्तुगालसाठी रोनाल्डोने पहिला गोल केला. त्याने हा गोल ६५ व्या मिनिटाला पेनल्टीवर केला. या गोलसह रोनाल्डोने इतिहास रचला आहे. पाच फिफा विश्वचषक हंगामात (२००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२) गोल करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. फिफाच्या जागतिक क्रमवारीत रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल ९व्या, तर घाना ६१व्या क्रमांकावर आहे. सामन्यात पोर्तुगाल संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. मात्र उत्तरार्धात रोनाल्डोने आपली चमक दाखवली. याशिवाय पोर्तुगालसाठी अन्य दोन गोल ब्रुनो फर्नांडिस आणि राफेल लियाओ यांनी केले.
हेही वाचाःKonkan Railway : ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!