BREAKING | अग्नितांडव! पुणे कॅम्पमधील दुकानांचा कोळसा

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज; २५ दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.

पंधरा दिवसातली दुसरी घटना…

कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्येदेखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचं मार्केट आहे. अत्यंत तोकड्या जागेत असलेलं हे मार्केट अनेक पुणेकरांचं आकर्षण राहिलंय. या आगीत व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलीये.

२५ दुकानांचा कोळसा…

या मार्केटमध्ये दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, दलाने काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होतं. या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी २५ दुकानं जळून खाक झालीत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून, ८ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आलीये. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आलीये.

आग्नितांडव

शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही आग लागलेली असताना बघता बघता संपूर्ण मार्केट जळून खाक झालं. आगीचे गोळे आकाशात दूरवर दिसत होते, अंदाजे २००० च्या वर कपडे, चप्पल, गॉगलची दुकाने आहेत, काही मिनिटांतच संपूर्ण मार्केट जळून खाक झालं. २००० साली एमजी रोडवरील व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी १ वर्षाच्या कालावधीपुरतं फॅशन स्ट्रीट (जुने कांबळे मैदान) याठिकानी जागा देण्यात आली होती. त्याचं आजतागायत नूतनीकरण झालेलं नाही. त्यावेळी व्यापाऱ्यांची संख्या ४०० होती, आज हीच संख्या २ हजाराहून अधिक झालीये. पार्किंगमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती, येथे अनेक व्यापारी संघटना अस्तित्वात आहेत.

२०१८ साली मार्केट धोकादायक असल्याचा दिला होता अहवाल

आगीत काही कोटींचे नुकसान झाले असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली, आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर फायर ब्रिगेडच्या गाड्या थांबवल्या होत्या. २०१७ मध्ये मुंबईतील कमला मिल परिसरात आगीची दुर्घटना घडली होती, त्यानंतर पुणे येथील फॅशन स्ट्रीटचे कॅन्टोन्मेंट, पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपाने २०१८ साली संयुक्तरित्या फायर ऑडिट करत फॅशन मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.

सुदैवाने जीवितहानी नाही

या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!