नवरात्रीचं विडंबन! ‘इरॉस नाऊ’ला मागावी लागली माफी

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केलेले विडंबनात्मक ट्विट अंगलट

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : सध्या सुरू असलेल्या नवरात्रीच्या सणावर विडंबनात्मक ट्विट करणं ‘इरॉस नाऊ’ला खुपच महागात पडलं. या ट्विटमध्ये काही बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्रींचे फोटो वापरून आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. या संदर्भात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि ‘इरॉस नाऊ’नं सगळे ट्विट डिलिट करत माफी मागितली.

कंगना राणावतने ‘इरॉस नाऊ’ला झापलं

सोशल मीडियावर हिंदूंच्या सणांचं, चालीरीतींचं विडंबन करणं सुरूच आहे. त्यात ‘इरॉस नाऊ’नं आक्षेपार्ह ट्विट करून भर घातली. मात्र हे धाडस त्यांच्या अंगलट आलं. करिना कपूर, सलमान खान, रणवीर सिंग यांचे फोटो वापरून ‘इरॉस नाऊ’च्या टीमनं काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सणाचं विडंबन केलं जात असल्याचा आक्षेप नोंदवला जाउ लागला. अभिनेत्री कंगना राणावतने ( Kangana Ranaut) या विषयावरून ‘इरॉस नाऊ’ला खडेबोल सुनावले. तसेच हजारो युजर्सनी इरॉसला घेरले. हे ट्विट डिलिट तर कराच, शिवाय हिंदूंची माफी मागा, अशी आग्रही मागणी होउ लागली. त्याची दखल घेणं इरास नाउला भाग पडलं. अखेर जाहीर निवेदन प्रसृत करून ‘इरॉस नाऊ’नं दिलगिरी व्यक्त करत सर्व ट्विट डिलिट करत असल्याचं निवेदन जारी केलं.

ट्विटरवर #BoycottErosNow ट्रेंड…

‘इरॉस नाऊ’नं माफी मागितली असली, तरी लोकांचा संताप कायम आहे. ट्विटरवर बॉयकॉट ‘इरॉस नाऊ’ #BoycottErosNow असा ट्रेंड सुरू असून हजारो नागरिकांनी आपली मतं प्रखर शब्दांत व्यक्त केली आहेत. अनेकांनी इतर धर्मांच्या सणावेळी ‘इरॉस नाऊ’ने अशी साळसुदपणे ट्विट केली होती, याचा पाढाच वाचला. शिवाय काहींनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘इरॉस नाऊ’नं केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर करत जाब विचारला. काहींनी या ट्विटवर अन्य धर्मांच्या सणांचा आक्षेपार्ह शब्दांत उल्लेख करून ‘इरॉस नाऊ’ ही ट्विट जाहीर करण्याचं धाडस दाखवू शकतं का, असा खडा सवाल केला आहे.

‘इरॉस नाऊ’ ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे. काही युजर्सनी ‘इरॉस नाऊ’विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!