यायी रे यायी रे… उर्मिला शिवसेनेत आयी रे!

विधानपरिषदेवर शिवसेनेकडून नाव निश्चित झाल्याची चर्चा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीव तिनं शिवबंधन हाती बांधलंय. आता विधानपरिषदेच्या जागेसाठी उर्मिलाचं नाव जवळजवळ निश्चितच झाल्याची चर्चा रंगली आहे.

राज्यपालनियुक्त जागेसाठी सेनेनं उर्मिलाचं नाव पाठवण्यात आलं होत. त्यामुळे आता अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची दाट शक्यता आहे. उर्मिला मातोंडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरें, रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिलाच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलंय.

उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसचा राजीनामा दिला होता. उत्तर मुंबई मतदार संघातून उर्मिलानं निवडणूक लढवली होती. मात्र त्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर राजकारण सक्रिय नसणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गट वादावर उर्मिला यांनी बोट ठेवत तेव्हा पक्षाचा राजीनामा दिला होता. आता लवकरच पत्रकार परिषद घेऊन त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!