भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा कोरोना पॉझिटिव्ह

जे पी नड्डा यांनी घेतलेली पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान झालं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतःच ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी तातडीनं चाचणी करुन घेतली. या चाचणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय.

संपर्कात असलेल्यांना सतर्क राहा

दरम्यान, ट्वीट करुन जे पी नड्डा यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोणतीही लक्षणं दिसल्यास तातडीनं कोरोनाची चाचणी करुन घेण्याचाही सल्ला दिला जातोय. तसंच आयसोलेट करण्याबाबतही आवाहन करण्यात आलंय.

पश्चिम बंगालमध्ये प्रचार

जे पी नड्डा यांनी तीन दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!