सात राज्यांमध्ये पोहोचला ‘बर्ड फ्लू’

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
मुंबईः कोरोना साथीच्या आजारात आणखी एक समस्या उद्भवलीये. जगभरात कोरोनाचं संकट कायम असताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केलीये. सात राज्यांत बर्ड फ्लू आढळला असून इन्फ्लुएन्झामुळे विविध राज्यांतील अनेक पक्ष्यांचा झपाट्याने मृत्यू होतोय.
या राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव
देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. या सात राज्यांमध्ये केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे. या आजाराचा इतरत्र प्रसार होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असं या राज्यांना कळविण्यात आलं. त्यांना काय उपाययोजना करावी, हेही सांगितलं गेलंय. केंद्रीय मच्छिमारी खाते, पशुसंवर्धन व डेअरी खाते यांनी सुचना केल्या आहेत.
केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा देऊन म्हटलेय, ज्या ठिकाणी बर्ड फ्लू मुळे मृत्यू होतायत अशा भागांतून नमुने घेण्याची गरज आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात फ्लूची लक्षणं असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी अधिकार्यांनीही मोहीम सुरू केलीये. पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद असलेल्या भागात काही निर्बंध लादण्याचे आदेश राज्य सरकारांनीही दिलेत. एक किलोमीटरच्या आत पोल्ट्री फार्म अस्तित्त्वात असल्यास त्याला देखील नष्ट केलं जाऊ शकतं.
ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे, तिथे खबरदारी घेण्यास सुरुवात झालीये.
मंदसौर – मध्यप्रदेशात आत्तापर्यंत १०० कावळ्यांचा मृत्यू
ज्या राज्यात बर्ड फ्लूचे प्रकार आढळले, तिथे उपाययोजना करण्यास सुरुवात झालीये. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये मंगळवारी प्रशासनाने चिकन आणि अंडी विकणारी दुकाने १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. येथील कावळ्यात बर्ड फ्लू आढळल्यानंतर अधिकारी सतर्क झाले व या संदर्भात उपाययोजना करण्यात आल्यात. मंदसौरमध्ये आतापर्यंत १०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान राज्यात ३७६ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे मध्य प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी सांगितलंय.
केरळात कोंबड्या-पक्षांची कत्तल
अलाप्पुझा व कोट्टायम दोन्ही जिल्ह्यांत बर्ड फ्लू आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोंबडीची आणि पक्ष्यांची हत्या करण्यास सुरुवात केलीय ज्या भागात जंतुसंसर्ग आढळतो त्या भागात पोल्ट्री मांस आणि इतर संबंधित उत्पादनांच्या विक्री व वापरावर प्रशासनाने बंदी घातलीये. या भागात आणखी संसर्ग रोखण्यासाठी ३०,००० हून अधिक पक्षी मारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यातील बहुतेक पक्षी पोल्ट्री फॉर्ममधील पक्षी आहेत. त्यांना मारण्यासाठी, जाळण्यासाठी आणि दफन करण्यासाठी १० -सदस्यांची टीम तैनात केलीये. ज्या भागात व्हायरस आढळलाय तेथे एक किलोमीटरच्या परिघात घरगुती आणि पाळीव पक्षी मारले जातील.
जुनागडात आढळले ५३ मृत पक्षी
गुजरातातील जुनागडमध्ये ५३ पक्ष्यांचा मृतदेह सापडल्यानंतर जिल्ह्यातील वन व वन्यजीव अधिकारी सतर्क आहेत. बर्ड फ्लू हे पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण असू शकतं, असा अधिकार्यांचा संशय आहे. जुनागड जिल्ह्यातील मनवर तहसीलच्या बटवा भागात ५३ मृत पक्षी सापडलेत. वन अधिकार्यांकडून याचा तपास सुरू आहे
हरियाणाच्या रायपूर राणीत शेकडो कोबड्यांचा मृत्यू
५ डिसेंबरपासून हरियाणाच्या रायपूर राणीमध्ये शेकडो कोबड्यांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत पक्ष्यांमध्ये एव्हीयन फ्लूची लक्षणं आढळली नसल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केलीये. तथापि, जालंधरच्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा केली जातेय. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही. हरियाणा पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ . सुखदेव राठी म्हणालेत, “शेजारच्या हिमाचल प्रदेशात एव्हीयन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
एव्हियन फ्लूमुळे आतापर्यंत १,९०० हुन अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पोंग धरण अभयारण्य आणि त्याच्या आसपासच्या भागात पक्ष्यांचा मृत्यू झालाय. जालंधर, पालमपूर आणि भोपाळच्या लॅबने त्यांच्या नमुन्यांमधील एच 5 एन 1 विषाणूची पुष्टी केलीये. एव्हियन फ्लूमुळे आतापर्यंत १,९०० हुन अधिक स्थलांतरित पक्षी मरण पावलेत. कांगडा जिल्हा प्रशासनाने आता पोंग धरण अभयारण्याच्या एक किनामोटर अंतरावर पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातलीये. अभयारण्याच्या नऊ किलोमीटरच्या परिघात पर्यटनविषयक सर्व कामे थांबविण्याशिवाय या भागात देखरेखीचं काम केलं जातंय.
राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात १०० पक्ष्यांचा मृत्यू
२७ डिसेंबर २०२० रोजी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात १०० पक्षी मृत सापडलेत. बर्ड फ्लूबाबत मंत्री लालचंद कटारिया यांच्या नेतृत्वात राजस्थानच्या पशुसंवर्धन विभागात तातडीची बैठक बोलविण्यात आलीये. प्राथमिक माहितीनुसार बर्ड फ्लूचा वेगवान प्रसार हा एच 5 एन 1 विषाणूमुळे झालाय.
महाराष्ट्रातही भीतीचं वातावरण
महाराष्ट्रात काही मृताक्षी आढळल्यामुळे राज्यात बई फ्लूचा धोका तर नाही ना हे पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांतील मृत कावळ्यांचे नमुने भोपाळच्या आयसीएआर – नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसेक्युरिटी ऍनिमल डिजीस या संस्थेकडे पाठवलेत. महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगड या राज्यात बर्ड फ्लू आहे की नाही हे तपासण्यासाठी येथील मृत पक्ष्यांचे नमुने भापाळला पाठवण्यात आलेत.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. एव्हीयन इन्फ्लुएन्झा ( एच 5 एन 1 ) हा विषाणूचा एक उप प्रकार आहे जो पूर्णपणे पक्ष्यांद्वारे पसरतो. १९९६ मध्ये चीनमध्ये प्रथम व्हायरसची ओळख झाली. हाँगकाँगमध्ये पोल्ट्री फार्म मधील कोंबडीला लागण झाल्यावर १९९७ मध्ये पहिल्यादा शिगन एच 5 एन 1 मानवांमध्ये आढळला.
बर्ड फ्लूची लागण मानवाला होऊ नये यासाठी घ्यायची दक्षता
-मृत जनावरांमुळे आजार पसरू नये यासाठी पाण्याची ठिकाणं, पक्ष्यांची विक्री केंद्र, प्राणिसंग्रहालय, पोल्ट्री फार्म या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी
-मृत जनावरांच्या मृतदेहांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावीमृत पक्ष्यांची तपासणी करताना किंवा त्यांना हाताळताना पीपीई किट परिधान करणं आवश्यक आहे
-मानवाला बर्ड फ्लूचा धोका पोहोचू नये यासाठी संबधित विभागाच्या सचिवांनी पोल्ट्री तसंच अंडी खाण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी