अंत भला तो सब भला! ही तर माझी शेवटची निवडणूक!- नितीश कुमार

नितीश कुमारांनी निवृत्ती घोषणा केली की काय?

Goan Varta Live | प्रतिनिधी

बिहार : बिहार निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. यंदाची निवडणूक ही शेवटची निवडणूक असल्याचं त्यांनी म्हटलंय. बिहारमध्ये घेण्यात आलेल्या एका प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.

अंत भला तो सब भला, असं म्हणत… ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्यात. आरजेडीचे तेजस्वी यादव यांनीही नितिश कुमार यांच्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.

पाहा नितिश कुमार काय म्हणाले?

तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधलाय. नितीश कुमार यांना बिहार सांभाळता आलं नाही, अशी टीका सातत्यानं आम्ही केली होती, असं ते म्हणालेत. निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या असताना त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं वक्तव्य करत भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलंय. वास्तवाचं भान आल्यानं त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.

काँग्रेसचाही निशाणा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!