Rakesh Jhunjhunwala | ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला!

ब्रीच कँन्डी रुग्णालयात 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे निधन झालं आहे. ते 62 वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे झुनझुनवाला होते. 
हेही वाचा:फोंडा तालुक्यातील पंचायत ​निवडणुकीत धक्कादायक निकाल…

विमान कंपनीचे उद्घाटन केले

राकेश झुनझुनवाला हे मागील काही वर्षांपासून आजारी होते. प्रकृती खालावल्याने झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते.
हेही वाचा:सत्तरीत प्रस्थापितांना धक्के…

मध्यमवर्गीयांचे लक्ष राकेश झुनझुनवालांच्या टिप्पणीकडे

राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी होते. जुलै 2022 अखेरीस त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं. यामुळेच मध्यमवर्गीयांचे राकेश झुनझुनवालांच्या टिप्पणीकडे, त्यांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लक्ष असायचं.
हेही वाचा:PANCHYAT | ELECTION | मुख्यमंत्र्यांचा करिश्मा पुन्हा दिसला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!