गेल्यावर्षी आत्महत्येची पोस्ट डिलीट केलेली आणि आता गळफास घेतला

बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीची आत्महत्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर डिप्रेशनचा विषय अधोरेखित झाला होता. आणि आता डिप्रेशनची शिकार असलेल्या एका अभिनेत्रीनं गळफास घेऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. गेल्यावर्षी जुलै महिन्यात जग सोडून जात असल्याची पोस्ट टाकून अभिनेत्री जयश्री रामय्या हिने खळबळ उडवून दिली होती. अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून तिनं आपलं आयुष्य संपवलंय. गेल्या काही काळापासून जयश्री डिप्रेशनशी लढत होती. अखेरच सोमवारी जयश्रीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. बंगळुरूत एका आश्रमात जयश्रीने गळफास घेत आयुष्य संपवलंय. नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची सांगितलं जातंय.

बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं समोर आलं. तसेच मेसेजला उत्तर देत नसल्यानं संशय व्यक्त केला जात होता. ही बाब तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला. आश्रमातील लोकांनी तिच्या खोलीत जाऊन बघितले असता तिनं आत्महत्या केल्याचं समोर आलं.

बिग बॉस कन्नडच्या तिस-या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नसल्यानं ती निराश झाली होती. सोशल मीडियातूनही तिनं आपली नाराजी व्यक्त केली होती.

जुलैमध्ये शेअर केली आत्महत्येची पोस्ट

2020मध्ये 22 जुलैला तिने सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडालेली. . फेसबुकवर आपण जग सोडत असल्याची पोस्ट तिने शेअर केली होती. तिची पोस्ट बघून सगळ्यांनाच धक्का बसला होता. यानंतर लगेचतिच्या काही मित्रांनी तिच्या घराकडे धाव घेतली होती.

नशिबाने जयश्री सुरक्षित होती. यानंतर जयश्रीने आत्महत्येची पोस्ट डिलीट केली होती. शिवाय एक नवी पोस्ट टाकत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले होते. मात्र अखेर निराश होत तिनं मृत्यूला कवटाळलंय.

हेही वाचा – वादग्रस्त फेसबूक लाईव्हच्या 10 दिवसांनंतर डॉ शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

बलात्काराचा आरोप होता शिक्षाही झाली आणि आता निर्दोष सुटका

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!