पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला आग

भाजीपाला, किराणा सामान जळून खाक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणे: बिग बास्केट कंपनीच्या बावधनमधील गोडाऊनला भीषण आग लागली. यात गोडाऊनचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली. याआगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

हेही वाचाः SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायरगाड्या आणि जवानांकडून आग विझवण्यात आली. सुदैवानं या आगीच्या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि गोडाऊन जळून खाक झालं आहे.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | GOA FORWARD | गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!