भूमी पेडणेकरच्या मावशीला अखेर मिळाली मदत

ट्विटरवरून मागितली मदत;

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून लोकांना बेड, ऑक्सिजन आणि वेंटिलेटर मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता बॉलीवूड स्टारसुद्धा मदत मागताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेसुद्धा ट्विटरवरून अशीच आपल्या नातेवाईकांसाठी मदत मागितली आहे.

हेही वाचाः बार्देश तालुक्यामध्ये अजून 16 मायक्रो कंटेन्मेन्ट झोन

ट्विट करत मागितली मदत

भूमी पेडणेकरने ट्विट करत म्हटलंय की, हे दिवस अजूनच अडचणीचे होत आहेत. मला माझ्या मावशीसाठी दिल्लीतील एनसीआरमध्ये व्हेंटिलेटरची गरज आहे. त्या सध्या आईसीयूमध्ये असून, त्यांना तात्काळ हलवण्याची गरज आहे. याबाबत कुणालाही माहिती असेल तर मला मॅसेज करा, असं ट्विट भूमीने केलं.

अन् अखेर मदत मिळाली

बरेचजण सोशल मीडियावरून मदत मागत आहे आणि त्याला प्रतिसाद देत अनेकजण मदतही करत आहेत. त्याचप्रमाणे भूमीने ट्विट केल्यानंतर अनेकांनी तिच्या पोस्टला उत्तर देत, महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर भूमीने ट्विट करत माहिती दिली की, माझ्या मावशीला मदत मिळाली आहे. यावेळी तिने ट्विटर वापरकर्त्यांचे आभारसुद्धा मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!