भुईबावडा घाट वाहतुकीला बंद!

कोल्हापुरातून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग

Goan Varta Live | प्रतिनिधी

वैभववाडी : कोकण व घाटमाथ्याला जोडणा-या महत्त्वाच्या मार्गापैकी एक असणारा भुईबावडा घाट वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या घाटाची वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

गोवा व कोकणात येण्यासाठी भुईबावडा घाट महत्वाचा मानला जातो. कोल्हापूरहून कोकण आणि गोव्यात येणारा भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक या मार्गे होत असते. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गगनबावडा येथे रस्त्यावर माती टाकून हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि गोव्यात येणाऱ्या वाहनांना वळसा मारून करूळ घाटमार्गे यावे लागणार आहे.

पुढील काही दिवस हा घाट मार्ग बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणा-यासाठी तसेच कोल्हापूर, बेळगावसह घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशासाठी वैभववाडीमार्गे जाताना करूळ घाट मार्ग हा एकमेव पर्याय आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!