बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन

८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोलकाता : बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं ८५ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती खालावल्यामुळे चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आलं होतं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सौमित्र चटर्जी यांनी काही दिवसांपूर्वी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. चटर्जी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बंगाली कलाविश्वातील मानाचं पान

सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी 1959 मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तीन वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , 7 फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!