सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

केरळमध्ये स्फोट, महाराष्ट्रातही आकडा वाढतोय, वाचा सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या आठवड्याभरापासून देशातला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात पीआयबीच्या माहितीनुसार 6 हजार
600 नव्या रुग्णांची भर पडलीय, तर देशात हा आकडा 41 हजार 49 एवढा आहे. त्यातही 41 हजार रुग्णांपैकी एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या ही निम्म्यावर आहे.

हेही वाचाः PROUD MOMENT | राजतिलक नाईक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

महाराष्ट्रात काय घडतंय?

बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात साडे सहा हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काही रिपोर्टनुसार तर हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटच्या हाती आलेल्या माहितीनुसार 7
हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत. तर 231 जणांना मात्र जीव गमवावा लागलाय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांचा आकडा हा 77 हजार 494 एवढा आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा बळी गेलाय.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर

केरळमध्ये कोरोनाचा स्फोट

केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाच्या 20 हजार 772 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 116 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. बकरी ईदला केरळ सरकारनं मोठी सुट दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोपही केला जातोय. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.

हेही वाचाः ऑगस्टमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या

देशाची संख्या चाळीस हजारावर

गेल्या चार दिवसांपासून देशात रोज कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडतायत. गेल्या चोवीस तासात 41 हजार 649 एवढे नवे रुग्ण सापडलेत. शुक्रवारी हाच आकडा 44 हजार 230 एवढा होता. दिलासादायक म्हणजे अजूनही रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यापेक्षा जास्त आहे. गेल्या चोवीस तासात 37 हजार 291 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत.

हा व्हिडिओ पहाः Video | Congress help flood victims | वाळपईत कॉंग्रेस धावली पुरग्रस्तांच्या मदतीला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!