BBC IT Survey : बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाची पाहणी, मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात अधिकारी दाखल

BBC Delhi Mumbai Office Income Tax Survey : बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

BBC Mumbai Delhi Office Income Tax Survey : बीबीसीच्या (BBC) कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. मुंबई आणि दिल्लीतील बीबीसी वृत्तसंथ्येच्या कार्यालयात (Income Tax) अधिकारी दाखल झाले आहेत. आयकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांची टीम बीबीसीच्या कार्यालयात दाखल झाली असून त्यांच्याकडून पाहणी सुरु आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसी कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करत आहेत. मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांमध्ये ही पाहणी सुरु आहे.

Opposition speaks in one voice to condemn the I-T raids on BBC India

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीसी ऑफिसमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन वापरण्यास मनाई केली आहे. बीबीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत एकत्र केलं आहे. दरम्यान सध्या आयकर विभागाची टीम कागदपत्रआंची तपासणी करत आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयकर अधिकारी आज बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून बीबीसीच्या वित्त विभागाच्या खात्यातील काही कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. आयकर विभागाने विभागाने खाते आणि वित्त विभागातील (Account of Finance Department) व्यक्तींचे काही मोबाईल फोन आणि लॅपटॉप/डेस्कटॉप जप्त केल्याचं सुत्रांच्या माहितीनुसार सांगितलं आहेत. आयकर अधिकारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बॅकअप घेतील आणि त्या व्यक्तींना परत देतील, असंही एएनआयच्या सुत्रांनी सांगितलं आहे

बीबीसीची प्रतिक्रिया काय?

Bhrasht Bakwaas Corporation' vs 'Ideological Emergency': Amid BBC Tax  Survey, United Oppn & BJP Clash

दरम्यान, यासंदर्भात बीबीसीने निवेदन जारी करत सांगितलं आहे की, ‘आज बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाने पाहणी केली. बीबीसीने ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे जाणीवपूर्वक पालन न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाने बीबीसी कार्यालयाची पाहणी केली. आयकर कायद्याच्या तरतुदींनुसार, अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीला ‘सर्वेक्षण’ असं म्हणतात, छापेमारी नाही. त्यामुळे याबाबत गोंधळ निर्माण करू नये.’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!