ऑगस्टमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या

अर्धा महिना बँका बंद; पटापट तपासा बँक सुट्ट्यांची यादी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: बँकेचं एखादं काम आपण नंतर कराल असा विचार करून पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ऑगस्टमध्ये बँकांना बंपर सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी आपलं काम अडकून पडू नये. ऑगस्ट महिन्यात जेव्हा आपण बँकेत जाल तेव्हा कदाचित आपल्या राज्यात बँकेची सुट्टी असू शकते आणि आपल्याला बँकेच्या गेटवर लॉक लटकलेला आढळू शकेल. अशा परिस्थितीत ऑगस्टमध्ये बँका केव्हा बंद होतील हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021: वंदनाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

आरबीआय सुट्टीचा निर्णय घेते

आरबीआय वेगवेगळ्या राज्यांनुसार बँकांच्या सुट्ट्या जाहीर करते. ऑगस्ट 2021 मध्ये बँका एकूण 15 दिवस बंद राहतील. दर रविवारी आणि महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय प्रत्येक राज्यात वेगवेगळे सण, जत्रा किंवा कोणत्याही विशेष कार्यक्रमामुळे त्या राज्यातील बँकांमध्ये सुट्टी असते.

हेही वाचाः दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक

ऑगस्ट 2021 मध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद

1 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँका बंद राहतील.
8 ऑगस्ट 2021: हा दिवस देखील रविवार आहे, म्हणून बँकेत सुट्टी असेल.
13 ऑगस्ट 2021: Patriots Day मुळे इम्फाल झोनमध्ये बँका बंद राहतील.
14 ऑगस्ट 2021: दुसर्‍या शनिवारी बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट 2021: रविवार आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बंद होतील.
16 ऑगस्ट 2021: पारशी नववर्षामुळे या दिवशी महाराष्ट्राच्या बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागांत बँका बंद राहतील.
19 ऑगस्ट 2021: मोहरममुळे आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर या भागांत बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2021: मोहरम आणि पहिल्या ओणममुळे बंगळुरू, चेन्नई, कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.
21 ऑगस्ट 2021: थिरुवोणममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.
22 ऑगस्ट 2021: रक्षाबंधन आणि रविवारी या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
23 ऑगस्ट 2021: श्रीनारायण गुरू जयंतीमुळे कोची आणि केरळ झोनमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
28 ऑगस्ट 2021: चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँका बंद राहतील.
30 ऑगस्ट 2021: जन्माष्टमीमुळे बँका या दिवशी बँका बंद राहतील.
31 ऑगस्ट 2021: श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

हेही वाचाः रविवारी साखळीत काँग्रेसची ‘सद्बुद्धी यात्रा’

पाच दिवसांचा मिळणार लाँग वीकेंड

एकंदरीत ऑगस्ट महिन्यात पाच दिवसांचे लाँग वीकेंड शनिवार व रविवार आहेत. ते 19-23 ऑगस्ट दरम्यान असू शकतात. अशा परिस्थितीत ज्या सुट्ट्या एकत्र येत आहेत, त्या विभागात त्यांना फिरायला जाण्याची उत्तम संधी आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | ASSEMBLY | कर्मचार्‍यांच्या टोप्या फेकल्या सभापतींच्या दिशेने

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!