यंदा दिवाळीत ‘या’ राज्यात फटाके फोडता येणार नाही!

कोरोनामुळे फटाक्यांवर बंदी घातली

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोनामुळे सगळेच आरोग्यबाबत अधिक सतर्क झालेत. अशातच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशातच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एका राज्यानं महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे दिवाळीत फटाके फोडता येणार नाहीत.

कुणी घेतला निर्णय?

राजस्थान सरकारनं फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. फटाक्यांवर निर्बंध घातल्यामुळे यंदा राजस्थानात दिवाळीला फटाके फोडता येणार नाहीत. तसे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय घेतलाय.

कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या त्रासात वाढ होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारनं म्हटलंय. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण आणखी वाढेल, अशी भीती आहे. तसंच रुग्णांनाही त्रास होईल. त्यामुळे फटाक्यांच्या विक्रीवर ताप्तुरच्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे.

आपल्याकडे काय?

लोकांनी आतषबाजीपासून लांब राहायला हवं असं आवाहन राजस्थान सरकारनं केलंय. दरम्यान गोव्यात मात्र उलट स्थिती पाहायला मिळतेय. पणजी पालिकेने नरकासूर साजरा करताना जे नियम घालून दिले होते, ते मागे घेण्यात आले आहेत. तर दुसरीकडे डीजे आणि गाण्यांवरीलही नियम उठवण्यात आले आहेत. पालिकेने मारलेल्या या युटर्नवरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र सध्यातरी राजस्थान सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत होताना पाहायला मिळतंय.

हेही वाचा –

#Good News : होम लोन झालं स्वस्त!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!