बाळ आमचं…आता बारसही आम्हीचं करणार – स्वप्नील लोके

पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर देवगड तालुका पत्रकार समिती व जांभेकर कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुका पत्रकार समितीच्या सन 2020-21 वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

हेही वाचाः भयंकर! यात्रेकरुंची बस कालव्यात कोसळली, 39 जणांना जलसमाधी

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

या कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, सिंधुभूमी फाउंडेशन अध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार पत्रकार राजेश मोंडकर व सुधाकर जांभेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व जांभेकर कुटुंबीयांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विनायक मिठबावकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर, सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष दयानंद मांगले, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार दिनेश साटम, ज्येष्ठ पत्रकार संतोष कुळकर्णी, तळेरे पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय खानविलकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे सर्व पत्रकार व तळेरे पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचाः खळबळजनक! तिने लग्नाला नकार दिला म्हणून त्याने केलं असं…

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार शहरी विभाग सिंधुदुर्ग लाईव्ह न्युज चॅनलचे देवगड प्रतिनिधी स्वप्नील लोके यांना देण्यात आला. सिंधूभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. तर ग्रामीण विभागासाठी दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार महेश तेली यांना देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. पत्रकार नागेश दुखंडे यांना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यंदा प्रथमच गेली दहा वर्षं व्याख्यानमालेचं आयोजन करणाऱ्या उमाबाई बर्वे ग्रंथालयास बाळशास्त्री जांभेकर विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सिंधूभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका पत्रकार समितीच्या पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणवंत मुलांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. तसंच इतर पुरस्कार प्राप्त पत्रकारांचादेखील समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हेही वाचाः ART & ARTIST | सिंधुपुत्राची चित्रकला ठरतेय कौतुकास्पद

स्वप्नील लोके म्हणाले…

पत्रकारितेच्या आजवरच्या 20 – 21 वर्षाच्या प्रवासात सहा जानेवारीला पत्रकार दिनाच्या निमित्ताने पोंभुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायचो. त्यावेळी सुधाकर जांभेकर यांचं एकच वाक्य असायचं, देवगडच्या पत्रकारांनी येथे काहीतरी करा, हे बाळ तुमचं आहे. बाळ कोणाचं आणि बारसं कोण करतंय, अशी अवस्था सध्या होतेय. त्यामुळे तुम्ही इथे काहीतरी करा, अशी भावनिक साद त्यांची असायची. मात्र राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आम्ही अधिकृतरित्या इथे आलोय व आता बाळ आमचं आहे, तेव्हा बारसंही आम्हीच करणार असल्याचं प्रतिपादन स्वप्नील लोके यांनी यावेळी केलं.

हेही वाचाः ऐतिहासिक! पहिल्यांदाच देशात महिलेला फाशी, वाचा शबनमचा गुन्हा तरी काय ?

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून देवगड तालुका पत्रकार समितीतर्फे पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं जाणार असल्याचा निर्णयदेखील देवगड तालुका पत्रकार समितीने यावेळी घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!