हसत हसत आत्महत्या करणाऱ्या आयशाची काळीज हेलावणारी गोष्ट

आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला होता

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गुजरातच्या अहमदाबादेत नदीत उडी टाकून आयशानं आत्महत्या केली. व्हिडीओ वायरल झालाय. नसेल पाहिला, तर खाली दिलेल्या लिंकवर पाहता येऊ शकेल. तिच्या संपूर्ण व्हिडीओमध्ये ती प्रेमाची भाषा बोलतेय. प्रेमाची भाषा करणाऱ्या आयशाच्या आत्महत्येने अनेकांचे डोळे पाणावलेत. आपल्या व्यवस्थेवर, सामाजिक विचारांवर सवाल उपस्थित करुन आयशा या जगातून नाहीशी झाली. पण तिनं जे केलं, त्यानं अनेक प्रश्नांना पुन्हा एकदा नव्यानं वाचा फोडली गेली आहे.

साबरमती नदीमध्ये उडी टाकून आयशानं जीव दिला. त्यानंतर गुजरात पोलिसांनी तिच्या पतीला राजस्थानातून अटकही केली. त्याला आता अहमदाबादेत आणलं जाणार आहे.

सवाल

जीव देण्याआधी आयशानं एक व्हिडीओ बनवला. हसत हसत प्रेमावर भाष्य करत तिनं जगाचा निरोप घेतला. तिचा व्हिडीओ तुफान वायरल झाला आहे. अनेकांच्या तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्यात. तिचा पती कोण आहे, तिच्या आत्महत्येचं कारण काय आहे, यावरुन लोक सवाल उपस्थित करु लागलेत.

पाहा व्हिडीओ –

आयशाचा पती आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करतो. ग्रेनाईट फॅक्टरीमध्ये तो सुपरवायजर पदावर काम करत होता. त्याचे वडील कंपनी देखभालीचं काम करतात.

काय झालं?

आयशाचं लहानपणापासूनच जालौशी आपलेपणाचं नातं बनलं बोतं. तिथल्याच राजेंद्र नगरमध्ये तिचे नातलगही राहत होते. शाळेच्या सुट्टीच्या दिवसात ती लहानपणी तिथं जात असे. जालौर शहराशी असलेल्या आपलेपणामुळे तिच्या आई वडिलांचं लग्न याच शहरात लावून दिलं.

वर्ष होतं २०१८. जालौर शहरात राहणाऱ्या आरिफ पुत्र बाबू खानसोबत तिचा विवाह झाला. या विवाहानंतर आयशाचा पती आणि तिच्या सासरकडचे तिला छळत होते, असा आरोप करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयशाच्या मामांनी हा आरोप केला आहे. याच कारणामुळे तिनं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. सध्या पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र आत्महत्येआधी तिनं केलेल्या व्हिडीओमध्ये सोशल मीडियामध्ये चर्चांना उधाण आलंय.

आयशाच्या मामानं आजतकशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दीड वर्षातच सगळंकाही बदलून गेलं. खरंतर आयशाचा प्रेमविवाह झाला होता. पण लग्नातर प्रेम तिरस्कारात बदलून गेलं. त्यानंतर दोघांमध्येही सातत्यानं वाद होत असल्याचं तिच्या मामांनी म्हटलंय. आयशाचा पती आरिफ तिच्यावर वारंवार हातही उचलत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आयशा त्या सगळ्यांना सोडून जालौरहून अहमदाबादमध्ये परतली होती.

कोण चुकलं?

हे सगळं होऊनही आयशानं आपलं कुटुंब पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्या पतीनं तिला साथ दिली आहे. आपल्या पतीसोबत झालेल्या अखेरच्या फोनमधील संवादानं आयशा हादरुन गेली होती. तू मरुन जा, अशा स्वरुपाचा त्या दोघांमध्ये टोकाचा संवाद झाला होता. त्यानंतरच आयशानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं कळतंय. मरणाआधी तिनं आपल्या पतीला दिलेलं वचनही पाळलं. तिनं आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडीओ आरिफ आणि त्याच्या कुटुंबीयांनाही पाठवला. व्हिडीओमध्ये तिनं आरिफला त्रास देऊ नका असं म्हटलं होतं, दरम्यान, आता त्याला अटक करण्यात आली आहे.

हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ करण्यात आला, असा आरोप आयशाच्या वडिलांनी केलंय. तिच्या हत्यारांना मी कधीच माफ करणार नाही, असंही ते म्हणालेत. माझ्या मुलीनं आम्हाला काही सांगू किंवा कळू नये म्हणून तिच्या सासरकडच्यांनी तिच्याकडून फोनही काढून घेतला, असा आरोप करण्यात आलाय. तिच्या आत्महत्येचा आरिफ आणि त्याचे कुटुंबीय जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सासरचे त्रास देत असल्याचं आयशानं आपल्या वडलांना सांगितलं होतं. त्यानंतर २१ ऑगस्टला अहमदाबादेतच पती आरीफ खान, सासू-सासरे आणि नणंदेविरोधात तिनं घरेलू हिंसेची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिच्या पतीनंच तिला जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याचा टेलिफोनिक संवाद समोर आल्याचं म्हटलंय. त्यामुळंच तिनं व्हिडीओ काढून या सगळ्यावर भाष्य केलंय. यानंतर आयशानं आपल्या कुटुंबीयांसोबतही बातचीत केली होती. पण त्यांना आपल्या मुलीला वाचवण्यात यश आलं नाही. त्यामुळे हुंड्यासाठी एका मुलीला जीव द्यावा लागल्यानं, सोशल मीडियात या सामाजिक प्रवृत्तीवर सडकून टीका केली जाते आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!