रायगड किनारी आढळलेली संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेची…

फडणवीसांचा खुलासा : बंद पडल्यावर बोट भरकटत रायगड किनारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी २ बोट संशयास्पदरित्या आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका बोटीत एके-४७ रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत खुलासा करताना ती बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असल्याची माहिती विधिमंडळाच्या सभागृहात दिली.
हेही वाचा:Crime | गोव्यातील ड्रग्सचे धागेदोरे हैदराबादपर्यंत!

बोटीमध्ये ३ ए. के. रायफल्स आणि दारुगोळा

विधिमंडळात फडणवीस म्हणाले, रायगडमधील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. बोटीमध्ये ३ ए. के. रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला. लाईफ जॅकेटसह संशयास्पद वस्तू
हेही वाचा:फातोर्डातील एका वेटरचा मृत्यू, ‘हे’ आहे कारण…

बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती

फडणवीस यांनी सांगितले की, बोटीबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोटीचे नाव ‘लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र, २६ जून रोजी सकाळी १० वाजता बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास एका कोरिअन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले.
हेही वाचा:चिखलीत अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एकाला अटक…

बोट भरकटत रायगडमध्ये

समुद्र खवळलेला असल्याने ‘लेडीहान’ या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागलेली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून प्राप्त झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा:Crime | पर्रात घर फोडून पळवला ऐवज…

केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात

स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून या घटनेचा तपास करीत आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांच्याशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा:एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांचा ‘धुमाकूळ’…

महाराष्ट्रातील पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्रातील पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली आहे. त्यात 3 एके-47 व स्फोटके सापडले आहेत. याशिवाय श्रीवर्धनमधील भरडखोल येथेही एक बोट संशयास्पदरित्या आढळली आहे. या बोटीमध्ये लाइफ जॅकेट आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने नाकाबंदी लागू केली.
हेही वाचा:Digital Strike | भारताचा ‘डिजिटल स्ट्राईक’, यूट्यूब वरील ‘या’ चॅनेल्सवर घातली बंदी…

बोटींबाबत स्थानिकांची चौकशी

दोन्ही बोटीजवळ कोणीही व्यक्ती सापडलेली नाही. बोटींबाबत पोलीस स्थानिकांची चौकशी करत आहेत. रायगडसोबतच मुंबई व आसपासच्या परिसरात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. तसेच, पोलिसांनी दोन्ही बोटीदेखील जप्त केल्या आहेत.
हेही वाचा:Digital Strike | गोमंतकीय युवकांना ‘अग्निवीर’ बनण्याची सुवर्णसंधी!

पोलिसांची खबरदारी

१३ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तैयबाचे १० पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत आले होते. ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स स्फोटकेदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. आतादेखील दोन बोटी संशयास्पदरित्या श्रीवर्धन किनाऱ्यावरच आढळल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. 
हेही वाचा:करोना नियमांचे पालन करा : बोरकर…

    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!