मालवणात नौकेवर हल्ल्याचा प्रयत्न

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचा प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्रातील मालवण जिल्ह्याच्या सागरी हदीत निवती रॉकनजीकच्या १६ वाव समुद्रात शनिवारी मध्यरात्री अडीच मत्स्यव्यवसायच्या शीतल गस्तीनौकेला परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी घेरत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सच्या या दहशतीमुळे मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करण्यास पुन्हा असमर्थ ठरला; मात्र काही हायस्पीड ट्रॉलर्सचे नंबर मिळविण्यात मत्स्यव्यवसाय विभागाला यश आलंय. या घटनेची – गंभीर दखल घेत याबाबतची तक्रार मुंबईतील सागरी पोलिस ठाणे तसंच निवती पोलिस ठाण्यात करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचाः खाण बंदीस तीन वर्षं पूर्ण

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचं अतिक्रमण

सागरी हदीत गेले काही महिने परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचं अतिक्रमण वाढलंय. त्याचबरोबर एलईडी दिव्यांच्या साहाय्यान अवैधरित्या मासमार सुरू आहे. मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हायस्पीडचं अतिक्रमण रोखण्याबरोबरच एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणारी अवैध मासेमारी विरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने गेले तीन दिवस येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे.

हेही वाचाः संगीताच्या तालावर रंगांची बरसात करणारा कलाकार हरपला

पारंपरिक मच्छीमारांकडून सातत्याने कारवाईची मागणी

मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान निवती रॉकनजीकच्या सुमारे १६ वाव समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे अवैधरीत्या मासेमारी केली जात असल्याचं दिसून आलं. याबद्दल तक्रार केली असता ही घटना निवती हदीत घडली असल्याचे सांगत तेथे तक्रार देण्यास सांगितलं. परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची वाढती दहशत गेली काही वर्षं परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीबाबत पारंपरिक मच्छीमारांकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जात आहे.

हेही वाचाः तणावपूर्ण वातावरणात न्हावेलीत जनसुनावणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!