धक्कादायक! युट्यूबवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न फसला

तरुणीची प्रकृती बिघडल्यानं दाखल करावं लागलं रुग्णालयात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः युट्युबवर व्हिडीओ पाहून अनेक जण वेगवेगळे प्रयोग करतात. अनेकदा आपण ते प्रयत्न फसलेले देखील पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार एका तरुणीने करण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न फसल्याने तरुणीची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

नक्की काय झालं?

एका बलात्कार पीडित तरुणीने गर्भवती झाल्यावरती गर्भपात करण्यासाठी युट्यूब व्हिडिओ पाहिला आणि गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या तरुणीची प्रकृती अचानक बिघडली आणि हा सगळा प्रकार उघड झाला.

मैत्री पडली महागात

आरोपी आणि पीडित तरुणीची एकमेकांसोबत मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा उचलत आरोपीने एकदा पीडित मुलीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला. इतकंच नव्हे तर या तरुणीचा व्हिडिओ तयार करून तिच्यावर तीन ते चार वर्षं अत्याचार केला. या संबंधातून ती गर्भवती राहिली. सहा महिन्याचे गर्भ पाडण्यासाठी तिने युट्यूब व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर तिला त्रास सुरू झाला. घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हा सर्व प्रकार नागपूरच्या यशोधरा नगर येथे घडला आहे. अब्दुल खान असं आरोपीचं नाव आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!