अर्णब गोस्वामींची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली! सुप्रीम कोर्ट म्हणालं की..

गोस्वामींना सुप्रीम कोर्टानं सुनावलं!

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : वेळोवेळी चर्चेत असणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिलाय. अर्णब यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत. तसंच तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिलाय.

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. सोबतच तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचीही विनंती याचिकेद्वारे करण्यात आलेली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावली आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जातेय. याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली.

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.

नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!