रिअर अ‍ॅडमिरल कपिल मोहन धीर यांची सहसचिव पदी नियुक्ती

या पदावर नियुक्ती मिळालेले ते पहिले सशस्त्र दल अधिकारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः रिअर अ‍ॅडमिरल कपिल मोहन धीर यांनी सैन्य व्यवहार विभागात संयुक्त सचिव (नौदल आणि संरक्षण कर्मचारी) पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदावर नियुक्ती मिळालेले  ते पहिले सशस्त्र दल अधिकारी आहेत. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि 01 जानेवारी 1985 रोजी भारतीय नौदलात त्यांची नियुक्ती झाली होती.

हेही वाचाः म्युकरमायकोसिसपासून बचावासाठी स्टिरॉईडसचा अतिरेक टाळावा

कार्यानुभव

ते सर्वात वरिष्ठ सर्व्हिंग मरीन कमांडो (मार्कोस) आहेत. आणि त्यांनी प्रीमियर मार्कोस आस्थापना कमांड, आयएनएस अभिमन्यु, भारतीय नौदल युद्धनौका आयएनएस खंजर आणि आयएनएस राणा आणि “ओपी पवन” आणि “ओपी ज्युपिटर” यासह देशांतर्गत आणि परदेशातील शांतता मोहीमा यासह किनारपट्टीभागात  अग्रभागी राहून काम केलं आहे. त्यांनी महत्त्वाच्या कार्यान्वयन आणि कर्मचारी विभागात काम केलं आहे. ज्यात नौदलाच्या पूर्व विभागातील ताफा कार्यान्वयन अधिकारी आणि वर्क अप प्रभारी कमोडोर, भारतीय नौदल वर्कअप टीम (आयएनडब्ल्यूटी), कोची यांचा समावेश आहे.

हेही वाचाः भाजपायुमो वास्को मंडळातर्फे आयुर्वेदीक औषधांचे वितरण

समृद्ध अनुभव

नौदल मुख्यालय तसंच एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयात विविध क्षमतांमध्ये काम केलेल्या या अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्रालयाचा समृद्ध अनुभव आहे. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. विशिष्ट सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्राप्त झालं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!