पद्म पुरस्कारासाठी नामांकने मागवली

15 सप्टेंबर 2021 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नवी दिल्लीतील भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पद्म पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून नामांकने मागवली आहेत. अशी माहिती समाजकल्याण संचालकांनी दिली आहे. याबाबत 15 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठवता येतील, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात. 

हेही वाचाः भाजप प्रदेशाध्यक्षांचं थिवी मतदारसंघात जोरदार स्वागत

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर तपशील उपलब्ध

एखाद्या क्षेत्रातील योगदान, कार्य याच्या आधारे या पुरस्कारासाठी गौरवले जाते. कला, साहित्य, शिक्षण, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, उद्योग, नागरी सेवा या क्षेत्रांतील योगदानासाठी पुरस्कार दिले जातात. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर याचा तपशील उपलब्ध आहे. सरकारी कर्मचाऱ्यांखेरीज इतर जण यासाठी पात्र असतील. सर्वसाधारणपणे राज्य सरकारे, केंद्र शासित प्रदेश तसेच केंद्राच्या मंत्रालयाकडून पुरस्कार मागवले जातात. पद्म समितीपुढे हे अर्ज ठेवले जातील.

नामांकने केवळ ऑनलाईन पाठवावीत

पद्म पुरस्कार समितीने केलेल्या शिफारशींवर हे पुरस्कार प्रदान केले जातात. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी केवळ ऑनलाइन पोर्टल https//padmaawards.gov.in. वर पाठवण्यात यावीत, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | WORLD PHOTOGRAPHY DAY SPECIAL | फोटोग्राफी आणि गोव्याचं काय आहे नातं…?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!