सचिन वाझेंसोबत कारमध्ये चक्क मनसुख हिरेन! CCTVत मोठा खुलासा, ४ मार्चला आढळलेला मृतदेह

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन एकत्र दिसल्यानं खळबळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : उद्योजक मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. जी स्कॉर्पिओ गाडी एंटिलिया प्रकरणात ताब्यात घेण्यात आली होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे आणि मनसुख हिरेन एकत्र एका गाडीतून प्रवास करत असल्याचं समोर आलंय. हे सीसीटीव्ही फुटेज १७ फेब्रुवारीचं असल्याचं बोललं जातंय. आज तकनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून पत्रकार साहिल जोशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सफेद रंगाची एक टॅक्सी स्टेशनवर थांबल्याचं पाहायला मिळालंय. ज्यातून मनसुख हिरेन बाहेर येताना दिसतात. तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक निळ्या रंगाची ऑडी कार दिसते. सचिन वाझे हे या निळ्या रंगाच्या ऑडीत असल्याचं सांगितलं जातंय. ही ऑडी कार सिग्नलवर थांबते आणि मनसुख हिरेन या ऑडीमध्ये बसून निघून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय.

निळ्या रंगाच्या ऑडी कारला सचिन वाझे चालवत असल्याचं समोर आलंय, ज्यात बसून मनसुख हिरेन पुढचा प्रवास करतात. ४ मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या संशयास्पद मृत्यूनं एकच खळबळ उडाली होती. मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांनी सचिन वाझे यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. आतापर्यंत एटीएस याप्रकरणाचा तपास करत होती. दरम्यान, आता एनआयएकडे याचा तपास देण्यात आला आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसान ४ मार्चला वाझे यांनी फोन करुन मनसुख हिरेन यांना ठाण्यात बोलावलं होतं. त्यांच्यावर तीन-चार आणखीही काही लोकं होती. त्यानंतर ऑफिसमध्ये येऊन छापेमारीच्या बहाण्यानं वाझे यांनी तपासाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनाही सध्या ठाणे फॉरेन्सिकच्या रिपोर्टची प्रतीक्षा असल्याचं कळतंय.

दुसरीकडे याचप्रकरणी तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसनं मनसुख हिरेन यांना बेशुद्ध करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केलाय. तर मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांची हत्या आधीच गंभीर वार झाल्याचं करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!