देशात 67.6% लोकांमध्ये अँटीबॉडीज

ICMRच्या सेरो सर्व्हेतून उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: देशात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अशातच इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने सेरो सर्व्हे केला आहे. या सेरो सर्व्हेच्या माध्यमातून देशातील 67.6 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या असल्याचं समोर आलं आहे. 

हेही वाचाः नेरुल येथे अर्भक टाकणाऱ्या संशयित वृद्धास अटक

सेरो सर्व्हेक्षणातून निष्कर्ष समोर

आयसीएमआरने नुकताच चौथा सेरो सर्व्हे केला होता. या सेरो सर्व्हेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष मंगळवारी जाहीर करण्यात आले. जून आणि जुलै या महिन्यांच्या दरम्यान हे सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडीज आढळून आल्याचं समोर आलंय. दरम्यान सुमारे 40 कोटी नागरिकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळले नसून या लोकांना मात्र कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कायम असल्याचं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ

चौथ्या सेरो सर्व्हेमध्ये 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश

आयसीआरच्या चौथ्या सेरो सर्व्हेमध्ये 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश करण्यात आलेला होता. दरम्यान या सर्व्हेतून आरोग्य क्षेत्रातील 85 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली आहेत. चौथ्या टप्प्यातील या सेरो सर्वेक्षणात 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांत समावेश करण्यात आले असून, आधीची तीन सर्वेक्षणंही याच ठिकाणी करण्यात आली होती. 

हेही वाचाः गोव्यातील खाण व्यवसायावरील अवलंबितांचं संरक्षण करण्यात भाजप अपयशी

पहिला सेरो सर्व्हे : 0.7 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

दुसरा सेरो सर्व्हे : 7.1 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

तिसरा सेरो सर्व्हे : 24.1 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

चौथा सेरो सर्व्हे : 67.6 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | CM at Delhi | हायकमांडने मुख्यमंत्र्यांना काय मंत्र दिला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!