मुंबईत ‘एनसीबी’कडून धडक मोहीम, 2 गुन्हे दाखल

एकूण ९ किलो चारस (हशिश), ४३६ एलएसडीचे ब्लॉट्स, ३०० ग्रॅम मारिजुआना जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः दरवर्षी जागतिक पातळीवर २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थ नियंत्रण विभाग मुंबईने (एनसीबी, मुंबई) नेहमीच ड्रग्स पुरवठादार आणि पेडलर्सविरुद्ध सतत लढा दिलाय. अंमली पदार्थ बाळगणे आणि अवैध तस्करीविरूद्ध पाळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त एनसीबीने मुंबईतील अंमली पदार्थ पुरवठादार आणि विक्रेत्यांविरोधात आठवड्याभराचे तीव्र अभियान सुरू केलं आहे.

हेही वाचाः ‘गोयांत आमका नाका व्यसन’ विषयावर गायन स्पर्धा

अमली पदार्थ जप्त

एनसीबी मुंबईने मुंबईतील विविध ठिकाणी ०२ ऑपरेशन्स सुरू केलेत. या ऑपरेशन्स दरम्यान एकूण ९ किलो चारस (हशिश), ४३६ एलएसडीचे ब्लॉट्स आणि ३०० ग्रॅम मारिजुआना असे अमली पदार्थ २१ आणि 22 जून 2021 रोजी जप्त केलेत. तसंच श्रेयस केंजले या भारतीय नागरिकाला अडवलं. सदर संशयिताची चौकशी सुरू आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरवर्षी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन 26 जून रोजी साजरा केला जातो.

हेही वाचाः तुये हॉस्पिटलमध्ये निवडणुकांपूर्वी सर्व सुविधा करणार उपलब्ध

गोरेगावातून ४३६ एलएसडीचे ब्लॉट्स, ३०० ग्रॅम मारिजुआना जप्त

21 जून रोजी पहिल्या ऑपरेशनदरम्यान विशिष्ट माहितीच्या आधारावर एनसीबी मुंबईच्या एका पथकाने गोरेगाव (पूर्व) मुंबईतील नगरे निवारा येथील श्रेयस केंजले यांच्या घरावर छापा टाकला आणि रात्री उशिरा ४३६ एलएसडीचे ब्लॉट्स (व्यावसायिक प्रमाण) आणि ३०० ग्रॅम मारिजुआना जप्त केले. संशयितावर गुन्हा क्र.  62/2021 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दादरमधून ९ किलो चरस (हशिश) जप्त

यापूर्वी १७.३ किलो चारस (हशिश) जप्त करण्यात आलेल्या कारवाईनंतर एनसीबी मुंबईच्या पथकाने दादर-मुंबई येथे ०२ दुचाकी शोधून जप्त केल्या. सखोल तपासणी दरम्यान आणि सांगितलेल्या दुचाकींच्या पेट्रोल टँकमध्ये पोकळी आढळली. २२ जून रोजी केलेल्या या कारवाईत पेट्रोल टँकच्या पोकळीतून एकूण ९ किलो चरस (हशिश) जप्त करण्यात आलं. या दुचाकींचा वापर संशयित राजविंदर सिंग आणि गुरमित सिंग (एनसीबी मुंबई सीआर क्रमांक ५७/२०२१ मधील आरोपी) यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!