ऐतिहासिक! पहिल्यांदाच देशात महिलेला फाशी, वाचा शबनमचा गुन्हा तरी काय ?

देशात पहिल्यांदाच महिला आरोपीला होणार फाशी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे इथे ना – ना प्रकारचे लोक आढळून येतात. गुन्हेगारीचं प्रमाणदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या गुन्ह्याचं प्रमाण तसं कमीच आहे. मात्र, असं असलं तरीही आजवर एकाही महिलेला फाशी दिल्याची घटना स्वतंत्र भारतात घडली नाहीये. पण आता स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फासावर लटकवलं जाण्याची घटना घडणारेय. उत्तर प्रदेशातील मथुरामधील एकमेव अशा फाशीघरामध्ये अमरोहाची रहिवासी असलेल्या शबनमला मृत्युदंड दिला जाणारेय. याबाबतची तयारी सध्या सुरू आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फासावर लटकावणान्या मेरठच्या पवन जल्लाद यांनी देखील दोनवेळा फाशीघराचं निरीक्षण केलंय. मात्र, अद्याप या फाशीची तारीख निश्चित झाली नाहीये.

हेही वाचाः आणखी एक घोटाळा! मेटा स्ट्रीपने कॅनरा बँकेला 90 कोटींना फसवले

शबनमचा काय होता गुन्हा ?

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने एप्रिल 2008 मध्ये आपल्या प्रियकराच्या सोबतीने आपल्या सात नातेवाईकांची कुऱ्हाडीने निर्दयीपणाने हत्या केली होती. अमरोहातील बावनखेडीमध्ये 2008 मध्ये ही खुनाची नृशंस घटना घडली होती. यावेळी शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत आपले वडील मास्टर शौकत, आई हाशमी, भाऊ अनिस आणि राशिद यांच्यासह आणखी तिघा नातेवाईकांची हत्या केली होती. हे सगळे त्यांच्या प्रेमाच्या आड येत होते. या प्रकरणामध्ये सुप्रीम कोटने शबनमची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

हेही वाचाः मोठी बातमी! शशी थरुरांसह 6 पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा

२०१० मध्ये सुनावली होती फाशीची शिक्षा

या प्रकरणात अमरोहा कोर्टात दोन वर्षं तीन महिने सुनावणी सुरू होती. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी कोर्टाने शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली होती.

राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला

कोर्टाने दिलेल्या निर्णयाला दोषी शबनमने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे. देशात एकमेव मथुरा तुरुंगात महिला आरोपींना फाशी देण्याची व्यवस्था आहे. तिथे शबनमला फाशी दिली जाऊ शकते. ती सध्या बरेली तुरुंगात कैद असून, तिचा प्रियकर सलीम हा आग्रा तुरुंगात आहे.

हेही वाचाः साळगावकर लॉ कॉलेजच्या प्रा. शिल्पा सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

महिलांसाठी एकमेव फाशीघर

महिलांना फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशातील हे एकमेव तुरुंग आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर या तुरुंगात एकाही महिला कैद्याला फाशीची शिक्षा दिलेली नाही. मथुरा तुरुंगात १८७० मध्ये फाशीघर तयार करण्यात आलं होतं. मात्र, तुरुंगातील नोंदीनुसार, देश स्वतंत्र झाल्यानंतर या फाशीघरात एकाही कैद्याला फाशी देण्यात आलेली नाही. मथुरा तुरुंगातील या फाशीघराच्या दुरुस्तीचे काम आता सुरू झालं आहे.

केवळ डागडुजी

शबनमच्या फाशीची तारीख अद्याप ठरलेली नाही. पण मथुरेच्या कारागृहात तिच्या फाशीची तयारी सुरू झालीये. निर्भया केसमधल्या गुन्हेगारांना फासावर चढवणाऱ्या पवन जल्लादने या ठिकाणी दोन वेळा भेट देऊन तपासणी केली आहे. फाशीघराची डागडुजी करण्यासाठी तुरुंग अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. फाशीघर खूपच जीर्ण झालं असल्याने त्याच्या डागडुजीसाठी पत्रव्यवहार केला सध्या सुरू आहे. दोरखंडाचीही मागणी केली आहे.

स्वतंत्र भारतात महिलेला फासावर चढवण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!