कोवॅक्सिन, स्पुतनिक वी नको, परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं

अमेरिकन शिक्षणसंस्थाची भूमिका; कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीबाबत अमेरिकन शिक्षणसंस्थांनी वेगळी भूमिका घेतली आहे. कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी  लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन शिक्षणसंस्थानी पुन्हा एकदा लसीकरण करण्यास सांगितलं आहे. अमेरिकेतील शिक्षणसंस्थांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली नाही.

हेही वाचाः भाऊचं आगमन झालं…अवघं कोविड सेंटर आनंदानं फुललं !

कोलंबिया विद्यापीठानं पुन्हा लसीकरण करण्यास सांगितलं

वृत्तसंस्था एएनआयनं बातमी दिली आहे. भारतातील मिलोनी दोशी या विद्यार्थिनीनं कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या अभ्यासक्रमासाठी तिला अमेरिकेला जायचं आहे. मात्र, कोलंबिया विद्यापीठाकडून तिला दुसरी लस घेण्यास सांगण्यात आलं आहे. मिलोनी दोशी ही विद्यार्थिनी आता पुन्हा लस घेतल्यावर आरोग्यावर काय परिणाम होणार याबाबत चिंतेत आहे.

हेही वाचाः 100 टक्के लसीकरण केलेलं पहिलं राज्य होण्याचं गोव्याचं उद्दिष्ट

जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली लस घ्यावी लागणार

अमेरिकेबाहेर राहून ज्या विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेनेने मान्यता न दिलेली लस घेतली असेल त्यांना 28 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. अमेरिकेतील एफडीए या संस्थेने मंजुरी दिलेली लस त्या विद्यार्थ्यांना घ्यावी लगाणार आहे.

हेही वाचाः VIDEO VIRAL: द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

अमेरिकन विद्यार्थ्यांना कोणती लस दिली

अमेरिकन सरकारनं त्यांच्या विद्यार्थ्यांना फायजर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन ही लस दिली आहे. या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली आहे. अमेरिकेत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यासमोर लसीकरणाची अट ठेवली गेली आहे. अमेरिकन काऊन्सिल ऑन एज्युकेशनचे सिनीअर व्हाईस प्रेसिडंट टॅरी डब्लू हार्टेल यांनी परदेशातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी यावं, असं म्हटलं आहे. भारतातून अमेरिकेत दरवर्षी जवळपास 2 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी जातात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!