भारताच्या कठीण काळात आम्ही सोबत आहोत

अमेरिकेनं दिलं मदतीचं आश्वासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा  सामना करत असलेल्या भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या महामारीच्या सुरुवातीलाच आम्ही भारताला मदत केली होती. पण, सध्या भारतातील स्थिती बिकट असून आता आणखीन मदत करण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत, असंही कमला हॅरिस म्हणाल्या.

हेही वाचाः ‘फलोत्पादन’कडून स्थानिक भाज्यांच्या दरांत मोठी कपात!

आमच्याकडून शक्य तेवढी मदत करू

कोरोना संक्रमणामुळे भारतात दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या धक्कादायक आणि मनाला वेदनादायी आहे. अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या सर्वांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यांच्या वेदना मी समजू शकते. या बिकट परिस्थितीत आम्ही आमच्याकडून शक्य तेवढी मदत करू, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचाः कोरोनामुळे मधुमेहींना होऊ शकतो ‘म्युकर मायकोसिस’

अमेरिकेकडून भारताना 95 मास्क, रेमेडिसवीरचे डोस

आम्ही यापूर्वीच भारताला रिफिलेबल ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत. आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील पाठवले आहेत. यासोबतच अमेरिकेने भारताला एन 95 मास्क तसंच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रेमेडिसवीरचे डोसही दिले आहेत. सध्याचं संकट पाहता आम्ही आणखी मदत करण्यासही तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचाः दोन डोसादरम्यानचं अंतर वाढवणार?

त्यावेळी भारताने आम्हाला मदत केली होती

भारत आणि इतर काही देशांना लसीकरण मोहिमेत मदत करण्यासाठी अमेरिकेत बनलेल्या लसी आणि औषधांचे स्वामित्व अधिकार खुले करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये जगातील कोरोनाच्या सर्वाधिक कोविड केसेस आहेत. कोरोनाची पहिली साथ पसरली त्यावेळी आम्हाला रुग्णालयात खाटा कमी पडत होत्या, त्यावेळी भारताने मदत पाठवली होती. आज भारताला मदतीची गरज आहे त्यामुळे आम्ही ही मदत करण्यासाठी तत्पर आहोत, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचाः फेसबूक कमेंटची मुख्यमंत्र्यांकडून दखल

अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला होणार फायदा

अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक लसीकरण मोहिमेला गती येण्याची शक्यता आहे. भारतासारख्या विकसनशील देशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता योग्य रॉयल्टी न देता कोरोनाची लस निर्मिती करता येऊ शकेल. तसंच अमेरिकेच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील कंपन्यांनाही आता कोवॅक्सिन या भारतीय स्वदेशी लसीचं उत्पादन करता येऊ शकणार आहे, असं सांगण्यात येत आहे. सर्व गोष्टी मिळून आल्यास लसींचं उत्पादन वाढेल आणि परिणामी कोरोना नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!