ALERT | एसबीआय ग्राहकांनो सावधान! चुकूनही इंटरनेटवर शोधू नका ‘हा’ नंबर

इंटरनेटवर टोल फ्री नंबर तपासणं धोक्याचं; एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः इंटरनेटवर टोल फ्री नंबर शोधणं धोकादायक ठरू शकते, अशी सूचना एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिलीय. एसबीआय कार्डने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. इंटरनेटवर टोल फ्री नंबर तपासणं आपल्यासाठी खूपच धोक्याचं आहे, असंही एसबीआयनं ग्राहकांना सांगितलंय. इंटरनेटवर टोल फ्री क्रमांक किंवा ग्राहक सेवा क्रमांक शोधू नका, असंही त्या मेसेजमध्ये म्हटलंय. तसंच एसबीआय कार्डने वापरकर्त्यांना अधिक माहिती दिलीय, त्यानुसार वापरकर्त्यांनी इंटरनेट वापरावं.

हेही वाचाः ALERT! पेट्रोल भरताना तुमची अशी होते फसवणूक!

टोल फ्री नंबर शोधणं धोकादायक ठरू शकतं

एसबीआयने ग्राहकांसाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय, की टोल फ्री नंबर शोधणं धोकादायक ठरू शकतं. जेव्हा जेव्हा आपल्याला बँक किंवा कोणत्याही कामासाठी ग्राहक सेवा आवश्यक असेल, तेव्हा आपण थेट इंटरनेटवर टोल फ्री किंवा ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध सुरू करता. इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर कॉल करून ते त्यांच्या समस्या सांगतात, ज्यामुळे आपली समस्या आणखी वाढू शकते.

हेही वाचाः गाडीवर काळी काच लावताय.. तर ही बातमी वाचाच…

एसबीआयचा इशारा काय?

एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘ग्राहक सेवा क्रमांक शोधण्यासाठी कधीही सर्च इंजिनचा वापर करू नका. यासाठी क्रेडिट कार्ड प्रदात्याच्या अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत एप्लिकेशनवर नेहमी जा आणि तेथून नंबर मिळवा. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपण ग्राहक सेवेसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करावा किंवा आपल्या क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या नंबरवर फक्त कॉल करा.’

ओटीपी, सीव्हीव्ही, पिन यासारखी वैयक्तिक माहिती देऊ नका

तसंच एसबीआय कार्ड म्हणते, ‘ओटीपी, सीव्हीव्ही, पिन यांसारखी वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. तसंच एसबीआय कार्ड प्रतिनिधी कधीही अशी माहिती विचारत नाहीत. कोणताही टोल फ्री नंबर किंवा ग्राहक सेवा नंबर फोन नंबरसारखे नसतात. ते नेहमीच 1800-, 1888-, 1844- इत्यादीपासून पासून सुरू होतात. ‘यात आपण इंटरनेटवर टोल फ्री नंबर शोधण्याचादेखील प्रयत्न केला पाहिजे आणि टोल फ्री क्रमांक माहीत नसल्यास अधिकृत वेबसाईटची मदत घ्या.

हेही वाचाः FRAUD | अखेर ती महिला ठकसेन गजाआड

फसवणूक कशी टाळावी?

आजकाल काही हॅकर्स सर्वात जास्त शोधलेल्या कीवर्डवर टोल फ्री नंबर रँक करतात. अशा परिस्थितीत समजा तुमच्याकडे एसबीआयच्या ग्राहक सेवेत काही काम आहे आणि ते इंटरनेटवर शोधून काढत असाल तर सर्चमध्ये तुम्हाला एक टोल फ्री नंबर दिसतो, जो चुकीचा असू शकतो. जेव्हा आपण या क्रमांकावर कॉल करता तेव्हा आपली बरीच वैयक्तिक माहिती संबंधितांना मिळते आणि त्यानंतर आपले खातेही रिकामे होऊ शकते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!