ALERT! ‘एचडीएफसी’च्या ‘या’ सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद

28 तासांसाठी सेवा राहणार बंद; पटापट कामं उरका

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः जर तुम्हीही देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे माहिती देत ​​आहे की, बँकेची ही सेवा 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता ते 8 ऑगस्टला रात्री 10 वाजेपर्यंत 28 तास बंद राहणार आहे. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगवर ग्राहकांना या सेवा मिळू शकणार नाहीत. या दरम्यान, जर एखाद्या ग्राहकाला या सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना तो घेता येणार नाही, यासाठी बँकेने माफीसुद्धा मागितली.

हेही वाचाः शिवोलीत ४.३० लाखांचे ड्रग्स जप्त

आम्ही सध्या शेड्युल्ड मेटनन्स करत आहोत

एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग व्यवहार केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. पण आम्ही सध्या शेड्युल्ड मेटनन्स करत आहोत. या उपक्रमादरम्यान एचडीएफसी बँक खालील व्यवहार नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग एप्सवर करू शकणार नाहीत.

हेही वाचाः ROBBERY | फोंड्यात दोघा चोरट्यांना अटक

नेट बँकिंगवर त्यांचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट डाऊनलोड होणार नाही

> बँकेचे ग्राहक 7 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता ते 8 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत मोबाईल किंवा नेट बँकिंगवर त्यांचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट डाऊनलोड करू किंवा पाहू शकणार नाहीत.
> त्याचवेळी 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सेवा घेऊ शकणार नाहीत.

हेही वाचाः ROBBERY | घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

जून तिमाहीत नफ्यात 14.36 टक्के वाढ

जून तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वर्षभरात 14.36 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि ती 7922 कोटी रुपये झाली. वर्षभरापूर्वी एप्रिल-जून तिमाहीत बँकेला 6,927.24 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता.

हेही वाचाः पुरामुळे फोंडा तालुक्यात ४२६ घरांची हानी

एप्रिल-जून तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 36,771 कोटी रुपये

एप्रिल-जून तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 36,771 कोटी रुपये झाले, जे एक वर्षापूर्वी 34,453 कोटी रुपये होते. या वर्षी 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचे सकल एनपीए प्रमाण 1.47 टक्क्यांवर वाढले, जे एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील 1.36 टक्के आणि मार्च तिमाहीत 1.32 टक्के होते.

हेही वाचाः विनावापर शाळांच्या वास्तू फोंडा तालुक्यात सर्वाधिक

आता तुम्ही डेबिट कार्डशिवाय ATMमधून पैसे काढू शकता

एचडीएफसी बँकेचे ग्राहक आता डेबिट कार्डशिवाय एटीएम मधून पैसे काढू शकतात. एचडीएफसी बँकेनेच या नवीन सुविधेची माहिती दिलीय. बँकेनेही याबाबत ट्विट केले आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘एटीएम कार्ड विसरलात? काळजी करू नका. एचडीएफसी बँक कार्डलेस कॅश आता #DigitallyYours आहे, ज्यामुळे तुम्हाला एचडीएफसी बँक 24X7 मधून रोख रक्कम काढता येते. एटीएम/डेबिट कार्डशिवाय अत्यंत सुरक्षित मार्गाने पैसे काढता येतील.

हा व्हिडिओ पहाः Video | FREE AMBULANCE | कुडचडे काँग्रेसचे नेते अमित पाटकर संतप्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!