वायुदल आणि नौदल युद्धपातळीवर कार्यरत

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी वैद्यकीय सामग्रीचा अव्याहत पुरवठा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशातील सध्याची कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय सामग्रीचा अव्याहत पुरवठा करण्याच्या दृष्टीने भारतीय वायुदल आणि भारतीय नौदल अथक कार्यरत आहेत. 10 मे 2021 च्या सकाळपर्यंत वायुदलाच्या विमानांनी देशाच्या निरनिराळ्या भागांतून 534 उड्डाणे करून प्राणवायूचे 336 कंटेनर्स वाहून नेले. त्यांची एकूण क्षमता 6,420 मेट्रिक टन इतकी होती. तसंच त्याबरोबर इतर वैद्यकीय साधनसामग्रीचीही वाहतूक केली. या उड्डाणांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर या शहरांचा समावेश होता.

हेही वाचाः एका सिलिंडरचे वाटेकरी दोन रुग्ण

विविध देशांतून आणले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि झिओलाइट

याशिवाय वायुदलाच्या विमानांनी 84 आंतरराष्ट्रीय उड्डाणे करून एकूण 1,407 मेट्रिक टन क्षमतेचे 81 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स तसंच 1,252 रिकामे ऑक्सिजन सिलेंडर्स, 705 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि झिओलाइट (श्वसनास उपयुक्त प्राणवायू निर्मितीचा कच्चा माल) वाहून आणले. ही सर्व सामग्री सिंगापूर, दुबई, थायलंड, युनायटेड किंग्डम, जर्मनी, बेल्जीयम, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि इस्राईल या देशांमधून आणण्यात आली.

समुद्रसेतू – II अभियान

समुद्रसेतू – II अभियानाचा भाग म्हणून भारतीय नौदलाची आयएनएस ऐरावत, आयएनएस त्रिकंड आणि आयएनएस कोलकाता ही जहाजे 10 मे 2021 रोजी, मित्रदेशांकडून अतिमहत्त्वाची वैद्यकीय साधनसामग्री घेऊन भारतात दाखल झाली. आयएनएस तलवार हे जहाज 05 मे 2021 या दिवशी मायदेशी पोहोचले.

याबद्दलची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- सारणी-

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!