संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके

Goan Varta Live | प्रतिनिधी
हरीद्वार: टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला हॉकी टीम सेमी सेमी फायनलमध्ये अर्जेंटीना विरुद्ध पराभूत झाली. पहिल्यांदाच ऑलिम्पिक सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमनं जोरदार लढत दिली. मात्र त्यांची ही झूंज अखेर अपयशी ठरली. अर्जेंटीनानं भारताचा 2-1 नं पराभव केला. भारताच्या या पराभवानंतर फटके फोडल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.
हेही वाचाः HDFC ची वादग्रस्त जाहिरात, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग
हॉकी टीममधील खेळाडू वंदना कटारीयाच्या घराजवळ फटाके फोडण्यात आले. हरीद्वार जवळ वंदनाचं गाव आहे. त्या गावातील काही तरुणांनी भारताचा पराभव होताच फटके फोडले. वंदनाच्या नातेवाईकांनी त्यांच्या या कृत्यावर आक्षेप घेतला. गावातील अन्य लोकांनीही त्यांना साथ दिली. या प्रकरणात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी वंदनाच्या नातेवाईकांनी केली आहे.
नेमक काय घडलं?
वंदनाचा भाऊ शेखरने दिलेल्या माहितीनुसार, सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी संघाच्या पराभवानंतर गावातील काही उच्चवर्णीयांनी त्यांच्या घराबाहेर फटाखे फोडत आनंदोत्सव साजरा केला. तसंच, कटारिया यांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसंच, हॉकी संघात दलित खेळाडूंची संख्या जास्त झाल्यामुळे भारताचा पराभव झाला, अशी खालच्या शब्दातील टीका केली.
हेही वाचाः पालिकेला अंधारात ठेवून नगरसेवकांचा दुकानावर कारवाईचा प्रयत्न
भारतीय टीमची ऐतिहासिक कामगिरी
भारताचा अर्जेंटीना विरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभव झाला. मात्र भारतीय महिलांनी त्यांच्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले आहे. भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता.
हेही वाचाः संशयिताची याचिका मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग
त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारतीय टीमला अजूनही ब्राँझ मेडल मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी ब्रिटनचा पराभव करावा लागेल.