अक्षय कुमारपाठोपाठ ४५ ज्युनिअर आर्टिस्ट पॉझिटिव्ह! कोरोनाचा कहर, शूटिंग बंद

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना बॉलिवूडमध्येही करोनाचं मोठं संकटं घोंगावताना दिसत आहे. आलिया भटला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी अभिनेता अक्षय कुमारनेही कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली. आता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या राम सेतू सिनेमाचं शूटिंग करताना संपर्कात आलेल्या ४५ जणांना लागण झाल्याचं समोर आलंय. अक्षय कुमार ‘राम सेतु’ सिनेमाचं शूटिंग करत होता. त्यानंतर आता ‘राम सेतु’च्या सेटवर 45 जणांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Video | जुना विक्रमही मोडीत! सोमवारी 1 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 478 जणांचा मृत्यू

४५ जणांना लागण झाल्यानं खळबळ

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार 5 एप्रिलला शंभर जण ‘राम सेतू’च्या सेटवर कामाला सुरुवात करणार होते. मुंबईच्या मडमधील सेटवर हे सर्व ज्युनिअर आर्टिस्ट सिनेमाच्या शूटिंगच्या कामाला सुरुवात करणार होते. मात्र अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली. त्यात 100 जणांपैकी 45 जणांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचा – कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट करा – विनायक राऊत

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिने एंप्लॉइज (FWICE)चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले,

राम सेतू सिनेमाची संपूर्ण टीम सर्व प्रकारची खबरदारी बाळगत आहे. दूर्दैवाने ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या 45 लोकांना करोनाची लागण झाली आहे. ते सर्व क्वारंटाइन आहेत.

चित्रिकरण थांबवलं!

अक्षय कुमारसह 45 जणांना करोनाची लागण झाल्यानंतर 5 एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारं ‘राम सेतू’ सिनेमाची शूटिंग बंद करण्यात आलं आहे. जवळपास 15 दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. अक्षय कुमारला करोनाची लागण होण्यापूर्वी तो राम सेतूचं शूटिंग करत होता.

हेही वाचा – कोरोना रुग्ण आढळलेल्या भागातील २० घरं कन्टेनमेन्ट झोन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!