अभिनेता सुरज थापर ICU मध्ये दाखल

बहिणीने याबाबत माहिती दिली आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘शौर्य और अनोखी’मध्ये काम करणारा अभिनेता सूरज थापरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूरजची बहिण वनीताने या संदर्भात माहिती दिली आहे. सूरज गोव्याला मालिकेचे शूट करत होता. गेल्या तीन दिवसांपासून सूरजला ताप आला होता. त्यामुळे चित्रीकरण संपवून तो मुंबईला परत येताच त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचाः रविवारपासून राज्यात कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता ‘या’ गोष्टी असणार बंद

गोव्यातून मुंबईत आल्यावर केली कोरोना चाचणी

गोव्याहून मुंबईला आल्यावर एअरपोर्टवर सूरजच्या दोन चाचण्या करण्यात आल्या. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि पल्स रेट चेक करण्यात आलं. तसंच सूरजने करोना चाचणी देखील करुन घेतली. पण करोना चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. मुंबईत आल्यावर ताप आला आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती दिली. गोव्यात मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना सूरज हा हॉटेलमध्येच थांबत असे. सेटवर शूटिंगदरम्यान गप्पा मारण्यासही परवानगी नव्हती. माझा भाऊ लवकर बरा होण्यासाठी कृपया सर्वांनी प्रार्थना करा, असं सूरजची बहीण वनिता हिने म्हटलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | गेल्या 24 तासांत राज्यात 3 हजार 751 नव्या रुग्णांची नोंद

लोकप्रिय मालिका

सूरजने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याच्या ‘ससुराल गेंदा फूल,’ ‘एक नई पहचान’ आणि ‘छल-शह और मात’ या मालिका लोकप्रिय ठरल्या होत्या. आता तो ‘शौर्य और अनोखी’ या मालिकेत काम करताना दिसत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!