कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : गेल्या काही वर्षात बदलत्या ऋतुचक्रामुळे आजारांची रुपही बदलताना दिसतात. जगावर कोरोनाचा सुरु असलेला विळखा 2019 च्या अखेरपासून अद्यापही नाहीसा झालेला नाही. त्यातच आता आणखी एका आजाराची भर पडलेली दिसते. या आजारामुळे प्रशासनही सतर्क झाले असून त्यावर मोठा निर्णयही घेण्यात आला.
हेही वाचा:’हा’ अभिनेता होता बिष्णोई गँगच्या निशाण्यावर…
रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर बंदी
मोठा निर्णय म्हणजे रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली. सतत हे काम करुन पोट भरणाऱ्यांसाठी अशी दुकानं मोठी फायद्याची असतात. तरुण पीढी याच खाद्यपदार्थांवर अवलंबून असल्याने व त्याच प्रमाणे स्वस्तात खायला मिळणंही बंद होणार असल्यामुळं समाजातील या वर्गापुढे अडचणी उभ्या झाल्या.
हेही वाचा:बहुमत चाचणी स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार…
कॉलरा या आजाराची पसरणारी साथ
कॉलरा या आजाराची पसरणारी साथ पाहता ती रोखण्यासाठीचा उपाय म्हणून काठमांडू खोऱ्यात असणाऱ्या रेहडी ट्रॅक परिसरात स्ट्रीट फूडवर बंदी घालण्यात आली. काठमांडू मेट्रोपोलिटन सिटी कडून हा निर्णय घेण्यात आला. या भागात रुग्णसंख्या वाढल्यामुळं हा निर्णय घेतला गेला व या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर रितसर कारवाई करण्यात येणार.
हेही वाचा:UPDATES | दुपारच्या ठळक घडामोडी…
पर्यटकांनीसुद्धा सुरक्षिततेची काळजी घ्यावी
या घटने नंतर काठमांडू येथील प्रशासकीय यंत्रणांकडून रेस्टॉरंंट आणि हॉटेलांनाही स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीसुद्धा स्वच्छ ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. त्याच प्रमाणे नेपाळमध्ये जाणाऱ्या पर्यटांसाठीही काठमांडू हे ठिकाण महत्त्वाचं ठरतं. पण, अशा पर्यटकांनीसुद्धा सदर परिस्थिती पाहता सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
हेही वाचा:पंचायत निवडणूक : न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत