ACCIDENT | बंगळुरु-कारवार एक्सप्रेस ट्रेनची हत्तीला धडक

मंगळवारी रात्रीची घटना; हसन जिल्ह्यातील सकलेशपुर जवळील हदसे गावात झाला अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आत्तापर्यंत माणसांचे अपघात होऊन माणसं मृत्यूमुखी पडण्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता मुके प्राणीही या अपघातांच्या जाळ्यात ओढले जातायत. मुक्या प्राण्यांचादेखील अपघातांमध्ये जीव जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्यात. मंगळवारी रात्री असाच एक अपघात घडलाय, ज्यात एका हत्तीला मरण आलंय.

हेही वाचाः कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होण्याची लक्षणे; वाचा एका क्लिकवर

कसा झाला अपघात?

मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात एका हत्तीला (टस्कर) मरण आलंय. हा हत्ती रेल्वेचा रूळ ओलांडत असताना ट्रेनने त्याला जोरदार टक्कर मारल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. ही धडक एवढी जोराची होती, की यात त्या हत्तीचा जागीच मृत्यू झालाय. हत्तीच्या मृत्यू मुळे प्राणीप्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जातेय.

कुठे झाला अपघात?

हसन जिल्ह्यातील सकलेशपुर जवळील हदसे गावात हा अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री 11.30 च्या दरम्यान या मार्गाने जाणाऱ्या बंगळुरु-कारवार एक्सप्रेस ट्रेनची धडक या हत्तीला बसल्याने हा हत्ती जागीच मृत्यूमुखी पडला.

हेही वाचाः ACCIDENT | बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; 16 प्रवासी जखमी

हत्तीला पळवून लावण्याचा केला प्रयत्न

अपघाताच्या 10 मिनिटं अगोदर, जेव्हा ट्रेनच्या सुरळीत पासिंगसाठी दरवाजे बंद केले जात होते, तेव्हा रेल्वे गेटवरील द्वारपालाला हत्ती दिसला नाही म्हणून हा अपघात घडला. मात्र ट्रेन जवळ येत असताना हत्ती ट्रॅकवर येऊन उभा झाला. ट्रॅकच्या दोन्ही बाजूला खोल खड्डा असल्याने हत्तीला कुठेही जाणं कठीण झालं असावं. हत्तीला ट्रॅकवरून बाजूला करण्यासाठी ट्रेन चालकाने हॉर्न वाजवला, ट्रेनला फ्लॅस लाईट टाकला मात्र सगळं व्यर्थ ठरलं. अनेक तासांच्या ऑपरेशननंतर क्रेनच्या साहाय्याने हत्तीचा मृतदेह रुळावरून हलवला गेला, ज्यामुळे ट्रेनचा प्रवास पुन्हा सुरू झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!