ACCIDENT | भीषण! कार-दुचाकीची टक्कर

दुचाकीस्वार गंभीर जखमी; कार चालकाला किरकोळ दुखापत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः एका बाजून कोरोना महामारी, तर दुसऱ्या बाजूने अपघातांचं वाढतं सत्र, दोन्ही काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथे गुरुवारी सकाळी असाच एक भीषण अपघात घडलाय. अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, अशी माहिती मिळालीये.

हेही वाचाः 2020 मध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू तरुणांचे

कुठे झाला अपघात?

कणकवलीवरून देवगडच्या दिशेनं जाणाऱ्या एक्टिवा गाडी व कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार या दोघांमध्ये नांदगाव सर्विस रोड क्रॉस करत असताना अपघात घडला. हा अपघात गुरुवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडला.

हेही वाचाः दुर्दैवी! ओल्ड गोव्यातील कार अपघातात पीएसआयचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीस्वार जखमी

अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहं. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचंही समजतंय. हा अपघात एवढा भयंकर होता, की अपघाताच्या ठिकाणी एका बाजूला हेल्मेट पडलं होतं, तर दुचाकी आणि कार एकमेकांमध्ये अडकले होते. कारमधील चालकालाही किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे.

हेही वाचाः पर्यटक कारचालक दारुच्या नशेत, कुळेतील अपघातात ४ पर्यटक जखमी

नक्की कसा झाला अपघात

हाती आलेल्या माहितीनुसार कोल्हापुरहून येणारी कार वेगात होती. कार वेगात असल्याने दुचाकी कारमध्ये अडकून फरफटत गेली. हा अपघात नांदगाव ब्रिज अलीकडे असलेला मिडल कट क्रॉस करून सर्विस रोडला जाताना झाला.

हेही वाचाः ACCIDENT | रस्त्याचा अंदाज न आल्याने झाला अपघात

… अन्यथा आंदोलन करू

नांदगाव येथील ग्रामस्थांनी लगेच हायवे ठेकेदार कंपनीला नांदगाव ब्रिज बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा आपण आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावेळी नांदगाव शिवसेने शाखा प्रमुख राजा म्हसकर, भाई मोरजकर, ग्रामस्थ आदम साठविलकर, भुपी मोरस्कर, प्रफुल तोरसेकर, बाळा सातवसे, जाफर बचावले, बाळा मोरये, पंढरी वायंगणकर उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!