धुक्याचा कहर! भीषण अपघात, 13 जणांवर काळाचा घाला

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : वर्षाच्या अखेरच्या दिवसापासून सुरु असलेलं अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सूरतनंतर आता पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला असून यात १३ जण गंभीररीत्या जखमी झालेत. तर जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे.

पश्चिम बंगलच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे हा अपघात घडला, असं सांगितलं जातंय. उत्तर भारतामध्ये सध्या थंडीची लाट आली सुरु आहे. त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पहायला मिळतं. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काल सुरतमध्ये अपघात

काल सुरतमध्ये भीषण अपघात झाला. रस्त्याशेजारी झोपलेल्या मजुरांना डंपरनं चिरडलं होतं. यात १५ हून अधिकांचा मृत्यू झााला होता. झोपेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला होता. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झालाय. अपघातांच्या या मालिकेनं सगळ्यांना धडकी भरवली आहे.

भीषण! फूटपाथवर झोपलेल्या ‘त्यांना’ ट्रकने चिरडलं

म्हापशातही अपघात

म्हापशात मंगळवारी रात्री अपघात झाला. म्हापशाच्या गिरी भागात झालेल्या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे म्हापशातील अनेक भागात विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळाला.

गिरीमध्ये ट्रकनं इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्यानं काही काळ वीज गायब झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर तात्काळ वीजविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वीज पुरवठा सुरळीत केला.

अपघात सत्र सुरुच

वर्षाच्या शेवटच्या दिवशी झालेला कशेडी घाटातील अपघात, त्यानंतर भंडाऱ्यातील शिशु केअर सेंटरला लागलेली आग, श्रीपाद नाईकांच्या गाडीचा अपघात, धारवाडमधील अपघात, कोलवातील अपघात आणि त्यानंतर आता सुरत आणि पश्चिम बंगालमधील अपघातांनी मोठी जीवितहानी झाली आहे.

धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!