कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग

झाराप येथील घटना; गाडीतील कोच पूर्णतः जळून खाक; बुधवारी सकाळची घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप रेल्वे स्टेशन परिसरात कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आग लागली. या आगीत कोच पूर्णत: जळून खाक झाला आहे. हा प्रकार आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचाः बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटवर ‘कोवॅक्सिन’ लस अधिक प्रभावी

बुधवारी सकाळची घटना

कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ ईलेक्टीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला बुधवारी सकाळी ९.३० ला आग लागली. तेर्सेबांबर्डे गेट जवळ ईलेक्टीकचे काम चालू असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या कोचला अचानक आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं.

आग आटोक्यात आल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला

या लागलेल्या आगीत बोगीचं आणि दुरूस्ती साहित्याचं नुकसान झालं आहे. कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने राजधानीसह, जनशताब्दी, मांडवी या रेल्वे अडकून पडल्या होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!