वाढत्या महागाईत थोडा दिलासा; खाद्य तेलाचे दर घटले

केंद्र सरकारले खाद्य तेलावरील आयात कर कमी केल्याने तेलाच्या दरात १७ ते २० रुपयांनी घट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: मागचे काही महिने एका बाजून कोरोना, तर दुसऱ्या बाजूने महागाईने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले होते. अशा परिस्थितीत एका बाजूने कोरोनाचं थैमान कमी होत असताना दुसऱ्या बाजूने महागाईच्या बाबतीत सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. केंद्र सरकारले खाद्य तेलावरील आयात कर कमी केल्याने तेलाच्या दरात १७ ते २० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे १४० रुपये लिटर या दराने विकले जाणारे पाम तेल आता १२० ते १२३ रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. तर अन्य तेल उत्पादकांच्या किंमतीत अजून कोणतीही घट झाली नसली तरी येत्या काही दिवसांत या उत्पादकांनाही किमतीत घट करावी लागणार आहे.

हेही वाचाः जुनासवाडा – मांद्रे येथे २.४ किलो ग्रॅम गांजा जप्त

ब्रॅंडेड तेलाची १६५ रुपये ते २०० रुपये लिटरपर्यंत विक्री

सध्या ब्रॅंडेड तेल सरासरी १६५ रुपये ते २०० रुपये लिटरपर्यंत विकलं जात आहे. स्वयंपाक ब्रँडेड तेलात करणं अनेकजण पसंत करत असले, तरी मध्यमवर्गीय तसंच गरीब कुटुंबांमध्ये पाम तेलाचाच मोठा वापर होतो. त्यामुळे पाम तेल राज्यात मोठ्या प्रमाणात खपतं, तर विविध ब्रॅंडेड कंपनीच्या तेलांमध्ये सनफ्लॉवर तेलाला मागणी अधिक असून राईस ब्रॅंड, पीनट तसंच सोयाबीन तेल हे अधिकतर उत्तर भारतीय त्याचं सेवन जादा करीत असल्याचं आढळून येत आहे.

हेही वाचाः JOB ALERT | राज्यात आज 8 ठिकाणी भरती मेळाव्याचं आयोजन

गोव्यात पाम तेलाला मोठी मागणी

गोव्यातसुद्धा सरासरीपेक्षा पाम तेलाला मोठी मागणी आहे. अन्य खाद्यतेलाप्रमाणेच पाम तेलाच्या किमतीसुद्धा गगनाला भिडल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानं त्याचा खिशाला चटका बसू लागला आहे. मात्र आता १७ ते २० रुपयांनी त्यांच्या किंमती घटल्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

हेही वाचाः अभिमानास्पद! भारतीय वंशाचा जस्टिन नारायण ठरला ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन 13’चा विजेता!

राज्यात महिन्याला १० लाख लिटर तेलाची गरज

गोव्यात सरासरी १० लाख लिटरच्या आसपास तेलाची आवश्यकता भासते असं आढळून आलं आहे. यात गोवा मार्केटिंग फेडरेशनकडून दर महिन्याला सुमारे ४० हजार लिटर तेलाची खरेदी केली जाते. लोकांकडून अन्य ब्रॅंडेड तेलाच्या तुलनेत पाम तेलाची खरेदी काहीशी अधिक केली जाते. पाम तेलातही रुची गोल्ड हा ब्रॅंड अधिक खपतो.

हेही वाचाः अमृता शेरगिल यांच्या चित्रांचा कलाकारांच्या दुनियेत विश्वविक्रम

दुकानदारांकडून लूट

पाम तेलाच्या दरात घसरण झाली असली तरी अजूनही काही खुल्या बाजारात दुकानदार ग्राहकाकडून प्रति लिटर १३० ते १३५ रुपये अशी किमत पाम तेलाच्या पिशवीवर आकारत आहेत. तर काहीजण १२० ते १२५ रुपये दराने अशा वेगवेगळ्या किंमतीत पाम तेलाची पिशवी विकत असल्याचं आढळून येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!