मालवण येथे मच्छिमारांची होडी बुडाली

10 ते 12 मच्छीमार सुदैवाने बचावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः समुद्रात मच्छीमारीसाठी जात असताना रापणीची पात (होडी) बुडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चिवला बीच समुद्र किनारी घडली.

पातीमधील 10 ते 12 मच्छीमार सुदैवाने बचावले

या पातीमधील 10 ते 12 मच्छीमार सुदैवाने बचावले. समुद्राच्या जोरदार लाटा ‘दर्यासागर’ या पातीला धडकल्यानं पातीच्या (साताडो) फळ्या तुटल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पातीचं 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान झालं.

समुद्राच्या जोरदार लाटांमुळे होडी बुडाली

मालवण मेढा येथील महेश हडकर यांच्या मालकीच्या ‘दर्यासागर’ या पातीने शुक्रवारी सकाळी ६ वा. सुभाष मिठबावकर, अशोक पेडणेकर, जॅकी गिरकर, बाबू मेंडिस, विजय फाटक, बाबल डिसोझा, बस्त्याव डिसोझा, कर्नल फर्नांडिस असं 10 ते 12 मच्छीमार चिवला समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात होते. काही अंतरावर समुद्राच्या जोरदार लाटा पातीला धडकू लागल्या. लाटांच्या जोराने पातीच्या फळ्या तुटल्या. काही क्षणाधार्थपात पलटी होऊन ती बुडाली. पातीमधील मच्छीमार समुद्रात कोसळले. त्यांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवत बुडालेल्या पातीला देखील सुखरूप बाहेर काढलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!