अजब गजब! विना हेल्मेट ट्रक चालवणाऱ्यास 1000 रुपयांचा दंड?

ओडिशाच्या गांजाम जिल्ह्यातील अजब प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ओडिशामध्ये हेल्मेट न घालता ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीचे 1 हजार रुपयांचे चलन कापण्यात आलं. ओडिशामध्ये परिवहन विभागाच्या दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. ओडिशाच्या गांजाम जिल्ह्यात हा प्रकार घडला. ड्रायव्हर प्रमोद कुमार हे ट्रकच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओला पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. परिवहन विभागाने दुर्लक्ष करूनही ट्रक चालकाला चलानचे पैसे जमा करावे लागले.

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

चलान कापल्याची माहिती नव्हती

प्रमोद कुमार नावाच्या ट्रक चालकाला चलान कापले गेल्याची अजिबात माहिती नव्हती. जेव्हा ते ट्रक परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी परिवहन विभाग कार्यालयात पोहोचले, तेव्हा त्यांच्या ट्रकचे चलन प्रलंबित असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, OR-07W/4593 या गाडीचे चलान जमा झालं नाही.

हेही वाचा – Video | Exclusive | नव्या आरक्षणावरुन कोर्टात जाण्याचा दयेश नाईकांचा इशारा

चालान का कापले गेलं?

यानंतर प्रमोद यांनी हे चालान का कापले गेलं? असं विचारलं असता हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे 1000 रुपयांचे चलन वजा करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण प्रमोद कुमार हे बाईक नव्हे तर ट्रक चालवतात. त्यामुळे ही सर्व घटना अचंबित करणारी होती.

हेही वाचा – 22 मार्चला निकाल लावू नका, थोडं थांबा, आमोणकर म्हणतात…

मी तर ट्रक चालक… मग हे चलान का?

आपण ट्रक चालक आहोत मग हे चलान का कापले? अशी विचारणा प्रमोद यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी हेल्मेट न घालता वाहन चालविण्याचं चालान ट्रकमधून कापलं गेलं आहे असं उत्तर त्यांना मिळालं. अधिकाऱ्यांनी काही ऐकून घेतलं नाही. चलान जमा केल्यावरच परमिटचं नूतनीकरण होईल असं अधिकारी म्हणाले.

हेही वाचा – VIRAL FACT | चांदेल पेडणेत प्रवाशांचा बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास

गेल्या तीन वर्षांपासून मी ट्रक चालवत असून ट्रकद्वारे पाणीपुरवठा करण्याचं काम करतो. ट्रकचा परमिटचं नूतनीकरण करणं आवश्यक होतं म्हणून मी तिथे गेलो असता हा प्रकार समजला असे प्रमोद सांगतात. परंतु परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि सक्तीने 1000 रुपयांचे चलान प्रमोद यांना भरावं लागलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!