सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 जुलैपासून वाढणार?

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील डियरनेस अलाऊन्स (डीए) आणि डियरनेस रिलीफ (डीआर) हे भत्ते वाढवण्यासंदर्भात शनिवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी देण्याविषयीही बरीच चर्चा झाली. मात्र, अनेक तासांच्या चर्चेनंतरही काही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. परंतु, या बैठकीनंतर सोशल मीडियावर केंद्र सरकार 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते वाढवणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या होत्या.

हेही वाचाः दहा हजार नोकऱ्या दिल्यास महिना ४० कोटींचा भार

चिठ्ठी बनावट

त्यासाठी केंद्रीय अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठीचा दाखला दिला जात होता. यामध्ये नमूद केलं होतं की, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले भत्ते म्हणजे डीए आणि डीआर 1 जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात येतील. तसंच हे भत्ते प्रलंबित असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सची जमा झालेली थकबाकीही अदा केली जाईल. केंद्र सरकार तीन टप्प्यात ही थकबाकी देईल, असं या चिठ्ठीत म्हटलं होतं. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना उत्साहाचं भरतं आलं होतं. परंतु, काही वेळानंतर #PIBFactCheck मध्ये ही चिठ्ठी बनावट असल्याचं निष्पन्न झालं.

हेही वाचाः नववीत शिकणाऱ्या गोव्यातील ‘या’ तीन मुलांनी केली कमाल

अफवांवर विश्वास ठेवू नका

केंद्र सरकारने अद्याप कर्मचाऱ्यांचा भत्ता किंवा थकबाकीसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे PIB कडून स्पष्ट करण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!