मोठी बातमी! मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएमध्ये वाढ

केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के मिळणारा महागाई भत्ता आता 11 टक्क्यांनी वाढून थेट 28 टक्के होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः दीड वर्षाहून अधिक काळ वाढलेल्या डीए आणि थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 1 वर्षात तीनदा महागाई भत्त्याला (डीए) ब्रेक लागला होता. परंतु आता 1 जुलैपासून सामान्य महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के मिळणारा महागाई भत्ता आता 11 टक्क्यांनी वाढून थेट 28 टक्के होणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता सरकार पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यास आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (सीसीईए) मान्यता दिली आहे.

हेही वाचाः राजधानीत जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला

डीए 17 ते 28 टक्के झाला

जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) तीन टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी 2021 मध्ये यात चार टक्क्यांनी वाढ झाली होती. अशा प्रकारे कर्मचार्‍यांना डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवून फायदा होणार आहे. मात्र, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यावर बंदी घातली होती. आता दीड वर्षानंतर तिन्ही हप्त्यांवरील स्थगिती काढून टाकण्यात आली.

हेही वाचाः पाकिस्तानात बसचा भीषण स्फोट ; 6 चिनी अभियंत्यांसह 13 ठार

कोरोनामुळे गोठवला होता डीए

कोरोना महामारीमुळे सरकारने डीए गोठविला होता. यासह माजी कर्मचार्‍यांच्या डीआरचे हप्तेही दिले गेले नाहीत. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचे मान्य केले होते.

हेही वाचाः भाजपच्या कोअर टीममध्ये बाबू कवळेकर, विश्वजीत, मॉविनची एन्ट्री

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता हा पगाराचा एक भाग आहे. कर्मचार्‍याच्या मूलभूत पगाराची ती निश्चित टक्केवारी आहे. देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते. ते वेळोवेळी वाढविले जाते. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनाही त्याचा लाभ मिळतो.

हेही वाचाः VIDEO VIRAL | नवरीची वरात पोचली पोलिस स्टेशनच्या दारात

अशा प्रकारे डीएची गणना केली जाते

महागाई भत्ता (डीए) च्या मोजणीसाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर हा आधार मानते आणि त्याआधारे दर दोन वर्षांनी सरकारी कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये बदल केला जातो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!