MODI GOVT | मोदी सरकारच्या सत्तेची सात वर्षं पूर्ण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ट्विट करून केलं अभिनंदन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला रविवारी 30 मे रोजी दोन वर्षं पूर्ण झाली. तसं पाहिलं तर, केंद्रात सत्तेवर येऊन मोदी सरकारला सात वर्षं पूर्ण झाली आहेत. या सात वर्षांत देशासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतले. या निर्णयाचं मुल्यमापन हे यश आणि अपयश या दोन्ही अंगाने होतच राहिल. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला 7 वर्षं पूर्ण झाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वटि करून त्यांचं अभिनंदन केलंय.

हेही वाचाः सुवर्ण गोव्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं ट्विट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं ट्विट करताना म्हटलंय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं यांनी यशस्वीरित्या पंतप्रधानपदाची 7 वर्षं पूर्ण केली आहेत. लोकांची आणि देशाची सेवा करण्याप्रती त्यांचं समर्पण आणि बांधिलकी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गोंयकारांच्या वतीने पंतप्रधानपदाची 7 वर्षं पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.

2014 साली मोंदींनी स्थापन केलं सरकार

2014 साली तब्बल 282 जागांच्या बहुमतासह मोदींनी सरकार स्थापन केलं. त्याच्या पुढच्याच 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारला तब्बल 300 जागांवर बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी सरकारला एका मोठ्या उंचीचा विश्वास प्रदान केला. त्यामुळेच मागील कार्यकाळाच्या तुलनेत 2019 हे साल अशाच अनेक मोठ्या आणि वादग्रस्त निर्णयांसाठीचं मोठं वर्ष ठरलं. नोटाबंदी, जीएसटी, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय, बालाकोट एअरस्ट्राईक, तिहेरी तलाक रद्दचा कायदा, सुधारित नागरिकत्वाचा कायदा, सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि तीन सुधारित कृषी कायदे हे काही महत्त्वाचे आणि वादग्रस्त निर्णय आहेत. यातल्या अनेक निर्णयांबद्दलचा वाद आणि विरोध अजूनही शमला नाहीये. मोदींची निर्णय घेण्याची पद्धती, ते राबवण्याची पद्धती, त्याला झालेला विरोध हाताळण्याची पद्धती आणि सरतेशेवटी हे निर्णय लोकांच्या गळी उतरवण्याची पद्धती या साऱ्या पद्धतींविषयीही लोकांना आक्षेप आहेत. मात्र, तरीही मोदी सरकारची प्रतिमा आणि त्यांची लोकप्रियता पुरेशी अबाधित असून यांच्यात म्हणावा तसा फरक पडला नाहीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!