हरियाणाच्या ५ मित्रांचा राजस्थानात अपघातात मृत्यू

बालाजीला जात असताना ओव्हरटेकच्या नादात कारची ट्रकला धडक

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरियाणाच्या फतेहाबादच्या ५ मित्रांचा राजस्थानच्या सीकरमधील फतेहपूरलगत झालेल्या भीषण अपघातात अंत झाला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास फतेहपूर-सालासर हायवेवरील सुरक्षी हॉटेलजवळ ओव्हरटेक करताना त्यांची रिट्झ कार ट्रकला धडकली.

मृतांत समावेश असणाऱ्या अजयला ४० दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. त्याच्यासाठी त्याने सालासर बालाजीला नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत तो बालाजीच्या दर्शनाला निघाला होता. पण रस्त्यातच त्यांचा अपघात झाला. पाचही मित्रांचे वय २५ च्या आसपास आहे.

ही धडक एवढी भीषण होती की सर्वच ५ तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकले. सोमवारी सकाळी या अपघाताची बातमी समजल्यानंतर पंचक्रोशीत दुःखाची लाट पसरली. हे तरुण भूथन कला गावचे होते. मृतांच्या नातलगांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचाः Drugs | डफल बॅगमधून घेऊन जात होता कोकेन, कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले

रविवारी सायंकाळी रिट्झ कारमधून निघाले होते

या अपघातात ठार झालेल्यांत फतेहाबादच्या बाडरी पालसरच्या अजय कुमार जयसिंह जाट व फतेहाबादच्या गाव भूतन कलांच्या अमित ईश्वर सिंह, संदीप शमशेर सिंह, मोहनलाल राधेयश्याम व प्रदीप प्रताप सिंह यांचा समावेश आहे. हे सर्वजण रविवारी सायंकाळी सालासर बालाजीच्या दिशेने रिट्झ कारमधून निघाले होते.

ओव्हरटेकच्या नादात अपघात

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हरियाणाच्या क्रमांकाची कार सालासरच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या धडकेच्या आवाजामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही त्याची माहिती दिली.

३ अविवाहित, एक मेडिकल स्टोअर चालक

पांडरी पालसर येथील अजय विवाहित होता. त्याला ४० दिवसांचा एक मुलगा आहे. मोहनही विवाहित होता. उर्वरित तिघे अविवाहित होते. मोहनलाल गावात मेडिकलचे दुकान चालवत होते. तर प्रदीप विद्यार्थी होता.

हेही वाचाः सांगेत धोकादायक झाड हटवले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!