धक्कादायक! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 420 डॉक्टरांचा कोविडमुळे मृत्यू

आयएमएची माहिती; दिल्लीत 100 डॉक्टर्सनी गमावला जीव मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः डॉक्टरांची संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात डॉक्टर्सचा मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. आयएमएने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, की दिल्लीतील 100 डॉक्टरांसह कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमध्ये 420 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचाः Modi Cried | मोदी रडतील! भविष्यवाणी खरी ठरली

दुसर्‍या लाटेत 420 डॉक्टरांचा मृत्यू

या अगोदर दोन दिवसांपूर्वी, आयएमएने म्हटलं होतं की देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमध्ये 329 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी बिहारमधील 80 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.  ‘आयएमए’ने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली. आयएमएच्या म्हणण्यानुसार बिहारमधील डॉक्टरांव्यतिरिक्त दिल्लीत 73, उत्तर प्रदेशात 41, आंध्र प्रदेशात 22 आणि तेलंगणात 20 डॉक्टरांचा बळी गेला आहे. आयएमएच्या म्हणण्यानुसार कोविड महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान 748 डॉक्टरांना कोविड संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे.ए. जयलाल यांनी सांगितलं की, आयएमएने देशभरात पसरलेल्या त्यांच्या शाखांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यादी तयार केली आहे.

पंतप्रधान झाले भावूक

विशेष म्हणजे शुक्रवारी कोविड -19 मुळे आपला जीव गमावलेल्या लोकांची आठवण करून पंतप्रधान नरेंद्र मोदीं भावूक झाले. डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी आलं. शुक्रवारी पंतप्रधानांनी काशीचे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!